आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमारस्वामींनी पहिले लग्न केले, तेव्हा जन्मली होती त्यांची दुसरी पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदाराबाद - कर्नाटक विधानसभेत सर्वात कमी जागा जिंकणाऱ्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी. कुमारस्वामी राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्याबद्दल एक इट्रेस्टिंग माहिती अशी, कुमारस्वामींची पत्नी राधिकाबद्दल उत्सूकता वाढली आहे. राधिका कोण आहे, लग्न होण्यापूर्वी काय करत होती याची माहिती जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया आणि गुगलवर सर्वाधिक सर्च होत आहे.

 

राधिका साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्ट्रेस आणि प्रोड्यूसर आहे. राधिका ही कुमारस्वामींची दुसरी पत्नी आहे. या दोघांमध्ये जवळपास 28 वर्षांचे अंतर आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी 58 वर्षांचे आहेत तर राधिका 31 वर्षांची आहे. या जोडप्याला एक मुलगी आहे तिचे नाव शमिका कुमारस्वामी आहे.

 

या दोघांच्या वयाच्या अंतराचा आणखी एक किस्सा सोशल मीडियावर चर्चेत आहे, तो म्हणजे, कुमारस्वामीचे पहिले लग्न झाले (1986) तेव्हा राधिकाचा नुकताच जन्म झाला होता.

बातम्या आणखी आहेत...