आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिराला प्रॉपर्टीबरोबरच हवी होती वहिनी, दोन्ही मिळवण्यासाठी भावावरच झाडली गोळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहापूर - उत्तरप्रदेशात वहिणीवरील एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने त्याच्या चुलत भावाची थेट गोळ्या घालून हत्या केली. 12 जून रोजी घडलेल्या या मर्डर मिस्ट्रीचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. भावाला मारल्यानंतर आरोपीला वहिणीशी लग्न करून त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी हडपायची होती. पोलिस अधीक्षक एस चिनप्पा यांनी गुरुवारी या खळबळजनक मर्डर मिस्ट्रीचा खुलासा केला. 


चिनप्पा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ज्या दिवशी आरोपीने हत्या केली त्याच दिवशी त्याच्या वहिणीचा वाढदिवस होता. 12 जूनला पीयूष सक्सेना (32) यांची त्यांच्याच घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कुटुंबाने मृताच्या मित्रांवर या हत्येचा आरोप लावला होता. पण तपासात समोर आले की, मृताचा चुलत भाऊ वहिणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्यातून हा सर्व प्रकार घडल्याचे नंतर समोर आले. 

 

पुढे पाहा व्हि़डिओ... 

 

बातम्या आणखी आहेत...