आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी मृत समजून शवागारात ठेवले; झाडूवाल्याच्या सतर्कतेनेे वाचला हिमांशू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छिंदवाडा- मध्य प्रदेशातील सरकारी रुग्णालयांच्या बेबंद कारभाराचा नमुना पुन्हा चव्हाट्यावर आला. ही घटना तेथील वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणारी आहे. छिंदवाड्यातील जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी भारद्वाज कुटुंबीयांतील तरुण मुलगा हिमांशू यास मृत घोषित केलेे. त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. िहमांशूचे कुटुंबीय शोकसागरात बुडालेले होते. यादरम्यान रुग्णालयातून पुन्हा एक धक्कादायक बातमी बाहेर आली की, “िहमांशूचा श्वासोच्छ्वास सुरू आहे’ रुग्णालयातील झाडूवाल्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच कुटुंबीयांत पुन्हा समाधानाचे वातावरण पसरले. हिमांशूला तत्काळ शस्त्रक्रियेच्या वाॅर्डात नेण्यात आले. हिमांशूच्या सर्व तपासण्यांनंतर नातेवाइकांनी त्याला नागपूरला नेेेले. तेथील शुअरटेक रुग्णालयात आता हिमांशूवर उपचार सुरू आहेत. 

 
रस्ते अपघातात गंभीर जखमी होता हिमांशू

हिमांशू भारद्वाज(३०) हा रविवारी दुपारी मुआरी हिंगलाजवळ स्कॉर्पिओ उलटल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागलेला  होता. या स्कॉर्पिओमध्ये हिमांशूसमवेत त्याची पत्नी रानी, मुलगी वीरू, बहीण रिमझिम आणि अन्य एक नातेवाईक होते. त्या सर्वांना किरकोळ दुखापती झालेल्या होत्या. जखमीवर जुन्नरदेव येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना छिंदवाड्यातील खासगी आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बेशुद्धावस्थेतील हिमांशू यास मात्र आनंद रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्यास ब्रेन डेड घोषित केले. पालकांनी त्यास त्वरित नागपूरच्या सीताबर्डी येथील न्यूरॉन रुग्णालयात नेले. 

 

चार तास हिमांशू शवागारात पडून 

डॉक्टरांनी हिमांशूला मृत घोषित केल्यानंतर पहाटे ४.१५ वाजता त्याला शवागारात हलवण्यात आले. सुमारे चार तास हिमांशूला बंद खोलीत ठेवण्यात आले होते.  

 

ब्रेन डेड आणि गंभीर  सांगून डॉक्टरांनी नागपूरहून पाठवले  

नागपूर येथील न्यूरॉन रुग्णालयात उपचारानंतर डॉक्टरांनी हिमांशूची प्रकृती खूप गंभीर असल्याचे सांगून परत पाठवले. तो ब्रेन डेड असल्याचेही त्यांचे म्हणणे होते. साेमवारी पहाटे ४ च्या सुमारास सर्व नातेवाइकांनी हिमांशूला जिल्हा रुग्णालयात नेले. तेथील डॉ. दिनेश ठाकूर यांनी तपासून हिमांशूला मृत घोषित केले. पहाटे ४.१५ वाजता त्याला जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले.  

 

 

मानेवर नजर गेली आणि पाहिले तर नाडी सुरू होती...  
मी सकाळी ८.३० वाजता शवागारात गेलो होतो. िहमांशूचे शवविच्छेदन होणार होते.  माझे लक्ष त्याच्या मानेकडे गेले. त्याची नाडी सुरू होती. मी शवागारातून त्याला बाहेर काढले आणि डॉ. निर्णय पांडे यांना माहिती दिली. त्यानंतर हिमांशूला अपघात विभागात नेण्यात आले. 
संजू सारवान, झाडूवाला  

 

 

सकाळी पल्स व श्वास सुरू नव्हता 
सकाळी पालकांनी हिमांशूला आणले तेव्हा वाहनातच त्याची तपासणी केली. तेव्हा पल्स व श्वास सुरू नव्हता. त्यानंतर त्याला मृत घोषित करून शवागारात पाठवले होते.  

- डॉ. दिनेश ठाकूर, कामावरील वैद्यकीय अधिकारी 

 

या अवस्थेला म्हणतात ट्रांझियनल  
ब्रेन डेडसारख्या अवस्थेत अशी परिस्थिती निर्माण होते. यास ट्रांझियनल असे म्हटले जाते. यात हृदय व पल्स काम करणे बंद करतात. पुन्हा सुरू होऊ शकतात. ब्रेन डेड अवस्थेत शरीरातील अन्य भागाचा संपर्क संपतो. ही अवस्था ट्रांझियनल आहे. 

-डॉ. सी. एस. गेडाम, प्रभारी शल्यचिकित्सक

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...