आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्यनाथांची कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये होळी; 20 वर्षांपासून नित्याने नरसिंह यात्रेत सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर- उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यंदा आपला होलिकोत्सव गोरखपूरमध्ये साजरा करणार आहेत. मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर त्यांची ही पहिली होळी आहे. गोरखपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आगमनानिमित्त सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दोन दिवस आदित्यनाथ येथे असतील. येथील गुलहरिया आणि पांडेय हाता येथून निघणाऱ्या होलिकादहन शोभायात्रेमध्ये ते सामील होणार आहेत. योगी या शोभायात्रेमध्ये गेल्या २० वर्षांपासून सहभागी होत आहेत.  


मुख्यमंत्री २ मार्च रोजी आरएसएसच्या नेतृत्वाखालील पारंपरिक नरसिंह शोभायात्रेमध्ये सामील होणार आहेत. या यात्रेचे नेतृत्व योगी आदित्यनाथ करतील. सायंकाळी ते गोरखनाथ मंदिरात होळी स्नेहमिलनात सहभागी होणार आहेत. येथे जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक त्यांची भेट घेतील. मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर गोरखपूरमध्ये उत्सवात ते प्रथमच सहभागी होत आहेत. जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे.  

 

१९४५ पासून नरसिंह यात्रेची परंपरा असलेले शहर
होळीच्या निमित्ताने भगवान नरसिंहाची शोभायात्रा काढण्याची परंपरा गोरखपूरमध्ये १९४५ पासून सुरू आहे. गोरक्षपीठाधीश्वर या शोभायात्रेचे नेतृत्व करतात. या शोभायात्रेदरम्यान दुतर्फा असलेल्या घरांमधून रंगाची उधळण केली जाते. या वेळी होळी शोभायात्रेत पीठाधीश्वर मुख्यमंत्रीदेखील आहेत. त्यांच्यावर शहरवासी रंगाची उधळण करणार आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.  

 

६ हजार पोलिसांना केले तैनात 
पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोरखपूरमध्ये ६ हजार पोलिसांना तैनात केले आहे. रस्त्यावर प्रत्येक मीटरवर एक सशस्त्र जवान तैनात राहील. शोभा यात्रेच्या ७ झोनमधून १९ सेक्टरमध्ये जवान तैनात असतील.शोभायात्रेच्या रस्त्यात तीन सुपर झोन आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांची निगराणी घरांच्या छतांवर राहील. घरांच्या गच्चीवर एटीएस कमांडो तैनात असतील. जिल्ह्याच्या बाहेरील ६ पोलिस अधीक्षक, १५ सीआे, १००० शिपाई, ४०० एसआय पदावरील व्यक्तींना गोरखपूरमध्ये कर्तव्यावर रुजू केले आहे. शोभायात्रेच्या मार्गावर बॅरिकेड्स टाकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...