आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीवर आधी बलात्कार केला, नंतर डोळे काढून घेऊन गेले आरोपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीची हत्या करून डोळे काढल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. दरम्यान मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हत्या करण्यात आली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नाराधमांनी हत्येनंतर मुलीचे डोळे काढून नेल्याचे समोर आले आहे.

 

असे आहे संपूर्ण प्रकरण....

- गुरूवारी सकाळी अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पन्ना जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. या प्रकरणी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
- 11 वर्षीय पीडिता पाचवीमध्ये शिकत होती. तिचा गळा आवळून धारदार शस्त्राने चेहऱ्यावर वार करून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  
- सध्या परिसरात तनावग्रस्त स्थिति निर्माण झाली असून आसपासच्या लोकांची गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी कमी केली आणि मृतदेह ताब्या घेतला आहे. 
- या घटनेने धक्का बसलेल्या नातेवाइकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. कुटुंबातील सदस्य प्रजापति यांनी सांगितले की, या नराधमांना अटक नाही केली, तर ते सामाजातील आणखी लोकांना नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे त्यांना खुले सोडणे धोक्याचे आहे.
- घटनेची माहिती मिळताच पन्ना एसपी रियाज इकबाल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, आरोपींनी अंत्यत निर्दयीपणे ही हत्या केली आहे. या प्रकरणात दुष्कर्मासह हत्या आणि इतर सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...