Home | National | Other State | Akhilesh Yadav Celebrates World Environment Day On BMW Cycle

एवढ्या महागड्या सायकलवर दोन मुलांसह फिरले EX CM, एवढ्या किंमतीत येईल एक फॅमिली कार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 06, 2018, 11:31 AM IST

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवारी आलिशान गाडी सोडून सायकलवर रपेट मारली.

 • Akhilesh Yadav Celebrates World Environment Day On BMW Cycle

  लखनऊ - समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवारी आलिशान गाडी सोडून सायकलवर रपेट मारली. यावेळी त्यांची मुलगी टीना, मुलगा अर्जुन त्यांच्यासोबत होते. माजी मुख्यमंत्र्यांची फॅमिली यावेळी BMW च्या क्रूज सायकलवर स्वार होती. अशावेळेस त्यांचे गार्डतरी मागे का राहातील, तेही फ्रेंच कंपनीच्या डेखाथ्लॉनच्या बीट्विन सायकलवर त्यांच्या मागे-पुढे चालले होते.

  माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इमामवाडा येथून हजरतगंजपर्यंत सायकलवर फेरफटका मारला. यावेळी हजरतगंज येथील दक्षिणमुखी हुनमान मंदिरात जाऊन त्यांनी दर्शनही घेतले.
  - यानंतर अखिलेश यादव मुलांसह सायकल चालवत गोमती रिव्हरफ्रंट येथेही गेले.

  एक लाखांची सायकल
  - अखिलेश यादव आणि त्यांची दोन्ही मुलं बीएमडब्ल्यूच्या क्रूजर सायकलवर स्वार होते.
  - जर्मन ऑटोमोटिव कंपनी बीएमडब्ल्यूची निर्मीती असलेल्या या सायकलची किंमत 1 हजार डॉलर (जवळपास 70 हजार रुपये) पासून पुढे आहे.
  - सायकलच्या वेगवेगळ्या मॉडेलची किंमत 1500 डॉलर (1 लाख रुपये) पर्यंत आहे.
  - अखिलेश मंगळवारी जेव्हा सायकलवर फिरायला निघाले तेव्हा त्यांच्या ताफ्यात 70 हजारांपासून 1 लाख रुपये किंमतीच्या 3 BMW क्रूज सायकल होत्या. या तिन्ही सायकलची एकत्रीत किंमत 3 लाख रुपयांपर्यंत होते, यामध्ये नॅनो सारखी फॅमिली कार नक्कीच खरेदी करता येते.

 • Akhilesh Yadav Celebrates World Environment Day On BMW Cycle
 • Akhilesh Yadav Celebrates World Environment Day On BMW Cycle
 • Akhilesh Yadav Celebrates World Environment Day On BMW Cycle
 • Akhilesh Yadav Celebrates World Environment Day On BMW Cycle

Trending