आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालाचे विश्लेषण: भाजपला तीन राज्यांत गतवेळच्या तुलनेत 61 टक्के जास्त मते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असा वाढला भाजपचा टक्‍का. - Divya Marathi
असा वाढला भाजपचा टक्‍का.

आगरतळा- भाजपने ईशान्येत डाव्या पक्षाचे वर्चस्व राहिलेल्या त्रिपुराला अखेर फत्ते केले. नागालँड व मेघालयातील आपल्या मतांचा टक्का वाढवण्यातही भाजपला यश मिळाले. या तीनही राज्यांत भाजपला २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ४.५१ टक्के मते मिळाली होती. यंदा ६६ टक्क्यांहून जास्त मते मिळवता आली आहेत.

 

भाजपला सर्वात जास्त ४३ टक्के मते त्रिपुरातून मिळाली. मेघालयात ९.७ टक्के व नागालँडमध्ये १४ टक्के मते मिळाली आहेत. एवढेच नव्हे तर तीन राज्यांत भाजपकडे केवळ एकच आमदार नागालँडमध्ये होता. त्रिपुरा व मेघालयात भाजपचे खाते नव्हते. भाजपने गतवेळी ७४ जागांवर निवडणूक लढवली होती. ७० जागांवर अनामत रक्कम जप्त.

 

- त्रिपुरात भाजपने ४३ टक्के मते मिळवली. एखाद्या पक्षाने राज्यातील आपल्या मतांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ करण्याचा हा विक्रम ठरला.
- त्रिपुरात काँग्रेस गत निवडणुकीत १० जागा व ३६. ५३ टक्के मते मिळाली होती. यंदा काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. काँग्रेसची व्होट बँक १.८ टक्के राहिली.
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आता देशात केवळ केरळमध्ये सरकार राहिले

- त्रिपुरा देशातील सातवे गैरहिंदी भाषिक राज्य आहे. येथे आता भाजप सरकार.

- २०१३ मध्ये भाजपला त्रिपुरा, नागालँड, मेघालयात ४.५ टक्के मते.

- २०१३ मध्ये ३ राज्यांत भाजपचा एक आमदार होता, यंदा ४८ विजय झाले.

 

बातम्या आणखी आहेत...