आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत मार्केटमध्ये येणाऱ्या 24 लेटेस्ट कार, पाहा स्टायलिश कारचे फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - जिनिव्हा मोटार शो 2018 च्या पहिल्या दोन दिवसांतच अनेक कंपन्यांनी आपल्या कार लाँच केल्या आहेत. दुसरीकडे अनेक कंपन्यांनी कॉन्सेप्ट कारही शोकेस केल्या आहेत. शोमध्ये लाँच होणाऱ्या बहुतांश कार इलेक्ट्रिक आहेत. 113 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या इव्हेंटमध्ये या वेळी 7 लाखांहून जास्त व्हिजिटर्स सामील होतील. हेच कारण आहे की लक्झरी कार बनवणारी BMW, एस्टन मार्टिन, बेंटले, जॅग्वार, फरारी, पोर्शे, मर्सिडीझ-बेंझ, वोल्वो, वोक्सवॅगन, टोयोटा, रेंज रोव्हर आणि ऑडी सारख्या कंपन्यांनी आतापर्यंत अनेक स्टायलिश कार लाँच केलेल्या आहेत.


या कार झालेल्या आहेत लाँच 


# ह्युंदाईची इलेक्ट्रिक SUV Kona
कोरियन कंपनी ह्युंदाईने आपली इलेक्ट्रिक SUV Kona सादर केली. या कारमध्ये 39.2kWh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी फुल चार्ज करून 300 किमीपर्यंत चालवली जाऊ शकते. कारचे इलेक्ट्रिक इंजिन 134hp आणि 395Nm टॉर्क जनरेट करतो. म्हणजेच 0 ते 100km चा वेग फक्त 9.7 सेकंदांतच घेते. या SUV ची टॉप स्पीड 155kmph आहे. ही फुल चार्ज करून 300 किलोमीटरपर्यंत नॉन स्टॉप चालवली जाऊ शकते.

 

# रेनो EZ-GO
रेनो EZ-GO पूर्णपणे ऑटोनोमस कार आहे. म्हणजेच यात ड्रायव्हरच्या बसण्याचीही जागा नसेल. ही कार सर्व प्रकारचे ड्रायव्हिंग रुल्स फॉलो करेल. म्हणजेच किती स्पीडने चालायचे आहे, पुढच्या कारपासून किती अंतर ठेवायचे आहे, किंवा ट्रॅफिकला कशा प्रकारे हँडल करायचे आहे. कंपनीने सध्या याची टॉप स्पीड 50 किमी ठरवली आहे. यात एकूण 6 प्रवासी एकत्र प्रवास करतील.

 

# 1905 मध्ये सुरू झाला होता शो 
जिनिव्हामध्ये पहिला मोटार शो 1905 मध्ये आयोजित केला होता. ते 29 एप्रिल ते 7 मे 1905 पर्यंत चालले. ऑटोमोबाइल इतिहासात सर्व प्रमुख कारच्या लाँचिंगचा हा साक्षीदार राहिला आहे. पहिल्या शोमध्ये 17,000 व्हिजिटर्स पोहोचले होते. यात स्टीम पॉवर्ड कार दाखवण्यात आल्या होत्या. कार आणि टू-व्हीलरसाठी 37 एक्झिबिशन स्टँड ठेवण्यात आले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जिनिव्हा मोटार शो 2018 मध्ये आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्वात स्टायलिश कार्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...