आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याने 60 हजारात डाकूला विकले, एक सामान्य मुलगी अशी बनली खतरनाक डाकू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर- क्राइमच्या दुनियेत महिलांचा देखील दबदबा राहिलेला आहे. खास करून 80-90च्या दशकात अनेक तरूणींचे अपहरण करून त्यांना डाकू बनवण्यात आले. मजबुरीने गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला भीतीचा नवा चेहरा बनून समोर आल्या. divyamarathi.com देशातील सर्वात खरतनाक महिलांची मालिका चालवत आहे. या मालिकेत जाणून घेऊया बीहडची दस्यु सुंदरी सीमा यादवची कहानी...


12 वर्षाच्या वयात डाकूंच्या मध्ये राहिलेली दस्यु सुंदरी सीमा यादव आता सामाजिक कार्यकर्ती बनली आहे. 2017 मध्ये तिने उत्तर प्रदेशमध्ये निर्धन समाज पार्टी ऑफ इंडियाची उमेदवार बननून निवडूक लढवली होती. आता तिचे लक्ष्य 2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आहे. divayamarathi.com शी बोलताना त्यांनी बीहडमध्ये घालवलेल्या दिवसांचा अनुभव शेअर केला आहे...


14 वर्ष मोठ्या व्यक्तीशी लावण्यात आले लग्न...
कानपूर देहातचे सिंकंदरा परिसरातील महरूपूर गावातील रहिवाशी सीमा यादवने सांगितले की, मी 11 वर्षाची होताच माझे वडिल जुलुम सिंह यांची आत्या माझ्या लग्नाचा अग्रह करू लागली. त्या काळात 10 वर्षाची होताच, मुलीचे लग्न लावून टाकण्यात येत होते. ऑक्टोबर1998 मध्ये इटावाच्या भवानीपूर गावातील रहिवाशी कल्लू सिहंशी माझे लग्न लावून देण्यात आले. तो 25 वर्षाचा होता आणि मी अवघ्या 11 वर्षाची. हुंड्यात एक सायकल, 25 हजार रुपये रोख आणि एक रिस्टवॉचसह घरगुती सर्व साहित्य दिले होते.


घरी येत होते डाकू....
- सीमाने सांगितले की, लग्नाच्या एका आठवड्यानंतर माझ्या घरी डझनभर बंदूकधारी लोक पति आणि सासऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. मी हैराण झाले होते, की हे डाकू येथे काय करत होते. मी भीत भीत त्यांना विचारले तेव्हा त्यांनी मला गप्प बसण्यास सांगितले. मी माहेरी गेले आणि हीच गोष्ट वडिलांना सांगितली तेव्हा त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले.
- सासरी दररोज डाकू येत-जात होते. एका रात्री दोन डझनपेक्षा जास्त डाकू आले. माझ्या पतिने मला सर्वांसाठी जेवण बनवण्यास सांगितले, तेव्हा मी नकार दिला. यावरून त्याने मला एवढे मारले की, मी बेशुद्ध झाले. घरातील एखही सदस्य मला वाचवण्यासाठी आला नाही. 
- मला डाकूंचे घरी येणे पसंत नव्हते. मी पतिला सांगितले की, हे सर्व थांबवले नाही, तर मी पोलिसांत तक्रार करेल. यावरून त्याने मला खूप मारहाण केली. त्या दिवशी जर माझा मानलेला भाऊ गंभीर सिंह मला भेटायला नसता आला तर मी मेली असले. गंभीर पैलवान होता आणि माझ्या सासरचे लोक त्याला भीत होते. त्याने धमकी दिल्यानंतर माझ्यासोबत होणारी मारहाण बंद झाली.

 

60 हाजार रुपयांत डाकूला विकले....
- लग्नाच्या सात महिन्यानंतर माझ्या पतिने माझ्या सौदा सलीम गँगच्या प्रमुखाशी केला होता. परंतु, त्याने माझा भाऊ गंभीरविषयी ऐकले तेव्हा त्याने सौदा रद्द केला. 1999 मध्ये पोलिस एन्काउंटरमध्ये माझा भाऊ मारला गेला आणि माझ्या वाइट दिवसांना सुरुवात झाली.
- एक दिवस माझ्या पतिने सर्व हद्दी पार करून मला विष टाकलेली दाळ पाजण्याचा प्रयत्न केला. माझ्या ओरडण्याने शेजारी जमा झाले, तोपर्यंत मी बेशुद्ध झाले होते. शुंद्ध आली तेव्हा मी चंदन यादव नावाच्या व्यक्तिच्या घरी होते. त्याने मला सांगितले की, माझ्या पतिने माझा सौदा 60 हजार रुपयांत केला आहे. 12 वर्षाच्या वयात मी डाकूंच्या मध्ये अडकले होते.
- मी त्याच्या समोर हात जोडले तेव्हा त्याने माझ्या वडिलांकडे 5 लाख रुपये आणि 5 एकर जमीनीची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार दिला. यानंतर त्याने माझ्या हातात शस्त्र दिले आणि मला डाकू बनवण्याचा सराव देऊन लागला.


पुढील स्लाइडवर वाचा एक सामन्य मुलगी सीमा यादव कशी बनली डाकू...? 

बातम्या आणखी आहेत...