आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकसाठी भाजपची 82 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर;एकून 154 नावांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्नाटकमध्ये १२ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सोमवारी ८२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दरम्यान, अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होईल.


भाजपच्या मुख्यालयात रविवारी सायंकाळी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या ८२ नावांना मंजुरी देण्यात आली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, बी. एस. येदीयुरप्पा, शिवराजसिंह चौहान, अनंतकुमार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. पक्षााने याआधी ७२ उमेदवार जाहीर केले आहेत.


सत्तारूढ काँग्रेसने सध्या २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमैया हे दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. उमेदवार यादीत नाव येताच मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी कुठलाही वेळ न दवडता म्हैसुरू जिल्ह्याच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून प्रचार सुरू केला. त्यांच्यासमोर भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) कडवे आव्हान असेल. भाजपनेही आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने राज्यात २२४ पैकी १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  


राज्यात सध्या जेडीएसला मोठ्या प्रमाणावर बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. राज्यसभा निवडणुकीपासूनच पक्षासमोर अनेक अडचणी येत आहेत. तेव्हा पक्षाच्या सात आमदारांनी पक्षादेशाचे उल्लंघन करून काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान केले होते. 


या सात आमदारांना पक्षाने निलंबित केले होते आणि त्यांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष के. बी. कोलीवाड यांच्यासमोर एक याचिका दाखल केली होती. हे सातही आमदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत म्हैसुरू येथे काँग्रेस पक्षात सहभागी झाले होते. काँग्रेसने या सर्व सातही आमदारांना तिकीट दिले आहे. दरम्यान या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी  जेडीएसला पाठिंबा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...