आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उ.प्र. विधान परिषदेसाठी घटक पक्षांचा दबाव वाढला, शहांच्या दौऱ्यादरम्यान नामनिश्चिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशात विधान परिषदेसाठी भाजपला ११ उमेदवार निवडायचे आहे. पैकी चार नावे पूर्वीच निश्चित झाली आहेत. त्यात विद्यमान मंत्री मोहसीन राज, महेंद्र सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासाठी आपली जागा सोडणारे सपा नेते यशवंत सिंह यांचे नावही निश्चित झाल्याची चर्चा असून, अपना दल, भारतीय सुहेलदेव पक्षाला प्रत्येकी जागा मिळू शकते.  


भारतीय सुहेलदेव पक्षाध्यक्ष व उ. प्र. मंत्रिमंडळातील आेम प्रकाश राजभर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपविरुद्ध बंड करण्याचे जाहीर केले होते. विधान परिषदेत स्थान मिळवण्यासाठी त्यांचे दबावतंत्र उपयुक्त ठरलेय. अमित शहा यांनी राजभर यांच्याशी दिल्लीत चर्चा करून पेच सोडवला होता. विधान परिषदेची एक जागा त्यांच्या मुलाला देण्यात येईल. भाजपचा मित्रपक्ष अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांचे पती आशिष सिंह यांना विधान परिषद सदस्यत्व मिळण्याची शक्यता आहे. अमित शहा यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा : राज्यातील दलित खासदारांची नाराजी व विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना शहांच्या दौऱ्याची प्रतीक्षा आहे. ११ एप्रिलला ते येथे येणार आहेत. मंत्रिमंडळ फेरबदलांवर शहांच्या उपस्थितीत चर्चा होऊ शकते. दलित आंदोलनानंतर भाजपसमोर नवी आव्हाने असल्याने विधान परिषदेसाठी दलित चेहरा देणे भाग आहे.  


दलित चेहऱ्याला संधी : उ.प्र.विधान परिषदेच्या ११ पैकी एका जागेवर दलित चेहऱ्याला संधी देण्याचा विचार भाजप करत आहे. विद्यासागर सोनकर यांच्या नावाची यासाठी चर्चा सुरू आहे. मतदान २६ एप्रिल रोजी हाेणार आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...