आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Couple Found Dead Right After They Caught In A Compromising Situation In Suspected Honour Killing

Honour Killing? रात्री GF सोबत नको त्या अवस्थेत पकडले, सकाळी पंख्याला लटकले होते दोघांचे मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जहानाबाद - बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात एका युवक आणि युवतीचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या प्रेयसीची भेट घेण्यासाठी रात्री तिच्या रुममध्ये शिरला होता. त्याचवेळी शेजाऱ्यांनी पाहून त्या मुलीच्या कुटुंबियांना सांगितले. यानंतर कुटुंबियांनी मुलाला पळवून लावत मुलीला बेदम मारहाण केली. त्याच्या दुसऱ्याच सकाळी या दोघांचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. 


त्या दोघांचा खून झाला, तरुणाच्या काकांचे आरोप
- पीडित मुलाचे नाव प्रकाश कुमार होते. आपल्याच गावात राहणाऱ्या एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. प्रकाश मंगळवारी रात्री चोरून त्या तरुणीच्या घरात शिरला होता. प्रकाशला तिच्या खोलीत जाताना शेजारच्या मंडळींनी पाहिले. याची माहिती त्यांनी वेळीच मुलीच्या कुटुंबियांना दिली. यानंतर अख्ख्या कुटुंबाने त्या दोघांनाही मारहाण केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांचे मृतदेह सापडले. 
- प्रकाशचे काका रामाधीर यांनी मुलीच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप लावला आहे. त्या दोघांनी आत्महत्या केली नाही. त्यांना मुलीच्या कुटुंबियांनी प्रतिष्ठेसाठी सुनियोजितपणे ठार मारले आहे असा दावा रामाधीर यांनी केला. त्याला ठार मारल्यानंतरच फासावर लटकवण्यात आले. कारण, प्रकाशच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्याला ज्या ठिकाणी लटकवण्यात आले तेथे रक्त सांडले होते असेही ते पुढे म्हणाले.


मुलीचे कुटुंबीय फरार
तरुणीच्या वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. हत्येचे आरोप लागल्यानंतर त्या मुलीच्या अख्ख्या कुटुंबियंनी गावातून पळ काढला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबियांनी सुद्धा हे प्रकरण ऑनर किलिंगचे असल्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत सविस्तर तपास सुरू असून मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेतला जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...