आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या करण्यासाठी चालले होते प्रेमी जोडले, पोलिस ठाण्यात झाली Engagement

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - शहरात एक प्रेमी जोडपे आत्महत्या करण्यासाठी कालव्याच्या दिशेने चालले होते. त्याचवेळी त्यांच्या एका मित्राने त्यांना पाहिले आणि असे करण्यापासून त्यांना रोखले. त्या त्यांना पोलिस ठाण्यामध्ये घेऊन गेला. पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि त्या दोघांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. रात्री उशीरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती. अखेर  पोलिस ठाण्यातच दोघांचा साखरपुडा उरकण्यात आला. 


- विवेक आणि त्याच्या शेजारी राहणारी निशा (काल्पनिक नावे) यांच्यात अडीच वर्षांपासून अफेयर सुरू होते. 
- दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. पण कुटुंबीय याच्या विरोधात होते. मुलीच्या कुटुंबीयांनी तर तिचे घराबाहेर निघणेही बंद केले होते. 
- विवेकचे म्हणणे होते की, त्याने निशाच्या कुटुंबीयांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पण त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता. 


5 तास चर्चा 
- विवेकने सांगितले की, पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. त्यानंतर सुमारे 5 तास वादविवाद आणि चर्चा सुरू होती. त्यानंतर दोघांच्या घरचे या लग्नासाठी तयार झाले. 
- पोलिसांनी चांगली मदत केली आम्ही आनंदी आहोत, असे या प्रकारानंतर दोघे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...