आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याने प्रेग्नंट महिलेला मारती लाथ, करावे लागले अबॉर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेने या प्रकरणात 2 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. - Divya Marathi
महिलेने या प्रकरणात 2 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती.

केरळ - केरळच्या कोझिकोडमध्ये पतीबरोबर मारहाण करण्यास विरोध केल्याने एका सीपीएम नेत्याने प्रेग्नंट महिलेला लाथ मारली. त्यामुळे महिलेला अबॉर्शन करावे लागले. महिला 4 महिन्यांची प्रेग्नंट होती. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सातही आरोपींना अटक केली आहे. 


काय आहे प्रकरण.. 
- एजन्सीच्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी 30 वर्षांच्या जोसना सिब्बी हिच्या पतीचे जमिनीच्या वादावरून शेजाऱ्याशी भांडण झाले होते. 28 जानेवारीला 7 जणांनी त्यांच्या घरावर हल्ला केला आणि जोसनाच्या पतीला मारहाण करू लागले. 
- जोसनाने पतीला सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हाच माकप नेते थम्वी यांनी जोसना यांच्या पोटात लाथ मारली. 
- महिलेच्या पोटात दुखायला लागले आणि रक्त वाहू लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी तिचे अबॉर्शन करावे लागले. 


महिलेवर तक्रार मागे घेण्याचा दबाव
- पीडित महिलेने या प्रकरणात 2 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. 
- महिलेचे पती सिबू यांनी सांगितले की, शेजारी आणि सीपीएमचे पार्टी वर्कर्स त्यांना धमकी देत आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी ते दबाव आणत आहेत. 


CPM ने काय म्हटले?
- सीपीएमने म्हटले की, त्यांचा आरोपींशी काहाही संबंध नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...