आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची डोपिंग टेस्ट बंधनकारक; व्यसनाधीनता हद्दपार करण्यासाठी पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची अमली पदार्थ प्रतिबंधक चाचणी म्हणजेच डोपिंग टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. पोलिसांसह राज्य सरकारच्या सर्व कर्मचारी भरती प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यात ही डोपिंग टेस्ट होईल. 


मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी बुधवारी हे आदेश काढले. पंजाबमधून व्यसनाधीनता हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने उचललेले हे दुसरे पाऊल आहे. यापूर्वी नशिले पदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी फाशीची शिक्षा व्हावी, अशी शिफारस राज्याने केंद्राकडे पाठवली आहे.

बातम्या आणखी आहेत...