आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे पाहुण्यांना दिला जातो Gold iPad, जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे बुर्ज अल अरब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - दुबईतील बुर्ज अल अरब जगातील सर्वाधिक महागड्या हॉटेल्सपैकी एक आहे. वेबसाइट www.jumeirah.com अनुसार या हॉटेलमध्ये चेक इन करणाऱ्या पाहुण्याला 24 कॅरेट सोन्याचा आयपॅड दिला जातो. या आयपॅडवर आयफोन कंपनीसोबतच बुर्ज अल अरबचा लोगो छापलेला असतो. हा आयपॅड हॉटेलमध्ये थांबणाऱ्या पाहुण्यांना राजेशाही अनुभूती यावी यासाठी दिला जातो. येथे जाणून घ्या, या आलिशान हॉटेलच्या काही खास गोष्टी...

 

यामुळे म्हणतात बुर्ज अल अरब
अरबी भाषेत बुर्जचा अर्थ आहे टॉवर. बुर्ज अल अरबचा अर्थ आहे अरबचे टॉवर. या हॉटेलला दुबईची शान मानले जाते आणि हे जगातील तिसरे सर्वात उंच हॉटेल आहे.

 

एका बेटावर बनलेले आहे हे हॉटेल 
बुर्ज अल अरब हॉटेल दुबईत नाही, तर दुबईच्या बाहेर बनलेले आहे. हे दुबईशी जोडलेल्या एका लहान बेटावर बनलेले आहे. याची उंची तब्बल 280 मीटर आहे. दुबईतून हॉटेलपर्यंत जाण्यासाठी एक छोटा पूल बनवण्यात आला आहे. बुर्ज अल अरब हॉटेलचे संचालन जुमेराह नावाची एक कंपनी करते.

 

हॉटेलच्या रेस्तराँ आणि रूमची वैशिष्ट्ये

- या हॉटेलमध्ये 202 खोल्या आहेत. छोट्या खोलीची साइज अंदाजे 1,820 स्क्वेअर फूट आहे, तर मोठ्या रूमची साइज 8,400 स्क्वेअर फूट आहे. रूमच्या भिंती पांढऱ्या आहेत. बाथरूममध्ये महागड्या टाइल्स लावलेल्या आहेत.
- या होटलचे रेस्तराँ एकदम खास आहे. जमिनीपासून तब्बल 660 फूट उंच असलेल्या रेस्तराँचे नाव अल मुन्तहा आहे. येथून दुबईचे विहंगम दृश्य दिसते.
- येथे अल महरा नावाचे एक आणि रेस्तराँ आहे. या रेस्तरांमध्ये तुम्हाला सबमरीनसारखा फिल येईल. येथे तुम्ही समुद्राच्या आतील दृश्य पाहून जेवणाचा आनंद घेऊ शकता.
- या हॉटेलच्या ठीक वर एक हेलिपॅडही बनलेला आहे.

 

कसे जाल बुर्ज अल अरबला?
या हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात आधी दुबईला जावे लागेल. दुबईला जाण्यासाठी मुंबई-दिल्लीतून अनेक फ्लाइट्स उपलब्ध आहेत. दुबईत बुर्ज अल अरबला जाण्यासाठी अनेक सुविधा सहज उपलब्ध होतात.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या हॉटेलचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...