आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अतिरेकी हल्ला, सीआरपीएफचे २ जवान शहीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनंतनाग- जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला. यात सीआरपीएफच्या एक सहायक उपनिरीक्षक आणि एक कॉन्स्टेबल शहीद झाले, तर एक जवान आणि नागरिक जखमी झाला. अनंतनागच्या अचाबल चौकात पथकावर अंदाधुंद गोळीबार करून दहशतवादी पळून गेले. 


दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. सहायक उपनिरीक्षक एम.एल.मीना आणि कॉन्स्टेबल संदीप सिंह अशी शहीद झालेल्यांची नावे आहेत. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवीने एका ई-मेलद्वारे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यादरम्यानच कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्यावर हल्ला केला. सुरक्षा दलांनी याला उत्तर दिले. 

बातम्या आणखी आहेत...