आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी बँड-बाजासह काढली वरात, केली फटाक्यांची आतिशबाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा- हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानंतर एका व्यक्तिीची बँड-बाजा आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत अंतयात्रा काढण्यात आली. बँडने रघुपति राघव राजा राम सारखे भजन लावण्यात आले होते. अंतिम यात्रा-अंत्यसंस्कार 40 मिनिटे चालले. याची व्हिडिओ शुटिंग देखील करण्यात आली. करोडिया गावातील रहिवाशी 39 वर्षीय भरत परमार यांना मुलींनी मुखाग्नि दिली. तीन मार्चला त्यांचा मृत्यू झाला होता.


हे होत यामागचे कारण...
- जवान मुलाच्या आकस्मित मृत्यूवरदेखील या पद्धतिने अंत्यसंस्कर करणाऱ्या भरतच्या वडिलांनी सांगितले की, माझा मुलगा भरतने कुटुंबासाठी आपले संपूर्ण आय़ुष्य वेचले आणि स्वत:चा जिव देखील दिला.
एक-एक दिवसात तो 10-11 ऑर्डर पूर्ण करत होता. त्याने पैसा आणि नाव खुप कमवले. आम्हाला देखील त्याच्यासाठी काहीतरी करायचे होते.
- कुटुंबाला सुखी-समृद्ध आयुष्य देण्याचा संकल्प आणि समर्पणामुले भरत आमच्यापासून खूप दूर निघून गेला आहे. परंतु, त्याने कुटुंबासाठी जे काय केले, त्याचा आम्हाला गर्व आहे.
- यामुळे आम्ही बँडबाजासह त्याचा अंत्यसंस्कार करून श्रेय देण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची नवी प्रथा सुरू केली आहे.
- भरतची पत्नी आणि मुलींच्या सहमतिनंतर आम्ही हा निर्णय घेतला.


72 लोकांचे आहे कुटुंब...
- भरतचे वडिल गोरधनभाई परमार वयोवृद्ध आहेत. त्यांनी सांगितले की, मला सुरूवातीपासून काहितरी वेगळे करण्याची आवड आहे. असे करणे मला आवडते.
- आमच्या वेळेस श्रीमंत लोक लग्न करण्यासाठी घोड्यावर सवार होऊन जात होते. मी उंटावर बसून वरात काढली होती.
- गावात असे करणारा मी एकटा होतो. मुलांचे मुंडनसाठी देखील बँड-बाजा मागवणारे आम्ही एकटेच आहोत. आमचे आजोबा-चुलते 12 भाऊ आणि 72 लोकाचे कुटुंब आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...