आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking - बायकोशी भांडणाच्या रागातून बापाने मुलाला पायाखाली चिरडून ठार मारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभल -  उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात शुक्रवारी एक हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बायकोशी झालेल्या भांडणाच्या रागातून पतीने त्यांच्या एका वर्षाच्या मुलाला अक्षरशः पायाखाली चिरडून ठार केले. या प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


आरोपीचे नाव अर्शद असून तो पत्नी अकिला आणि मुलगा अरहानबरोबर राहतो. शुक्रवारी अर्शद आणि अकिला यांचे काही घरगुती वादातून भांडण झाले. त्या दोघांचे भांडण एवढे विकोपाला गेले की, अर्शद त्यामुळे प्रचंड संतापवा. पण त्याचा राग निघाला तो एका त्यांचा एका वर्षाचा मुलगा अरहानवर. अर्शद आणि अकिलाच्या भांडणावेळी अरहानही त्याठिकाणी होता. भांडणामुळे संतापलेल्या अर्शदने अरहानवर राग काढण्यासाठी त्याला थेट पायाखाली चिरडले. या प्रकारात अरहानचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी अर्शदला अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...