आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुल चार्ज होऊन 300km नॉनस्टॉप चालते Hyundai ची ही कार, इतकी आहे किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - जिनिव्हा मोटार शोमध्ये ह्युंदाईने आपली इलेक्ट्रिक SUV कोना (Kona) सादर केली आहे. कंपनीचा असा दावा आहे की, या कारला फुल चार्ज करून 300 किमीपर्यंत नॉन स्टॉप चालवले जाऊ शकते. तथापि, याआधी असेही वृत्त होते की, ही कार 500 किमीपर्यंत धावू शकते. ह्युंदाईने या कारला स्टायलिश डिझाइनने आणखी दमदार बनवले आहे. कंपनीचे MD आणि CEO वाईके कू म्हणाले की, आमचे टारगेट दर महिन्याला 50 ते 60 कोना SUV ची विक्री करणे आहे. याची किंमत 25 लाखांच्या जवळपास असू शकते.


# 9.7 सेकंदांत 100km ची स्पीड
कोरियन कंपनीचा दावा आहे की, या कारमध्ये 39.2kWh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही फुल चार्ज करून 300 किमीपर्यंत चालवली जाऊ शकते. या कारशी निगडित सूत्रांचे म्हणणे आहे की, कंपनीने यासाठी 100kW चे फास्ट चार्जर बनवले आहे. याच्या मदतीने 6 तास 10 मिनिटांत ही फुल चार्ज होऊ शकते. कारचे इलेक्ट्रिक इंजिन 134hp आणि 395Nm टॉर्क जनरेट करते. म्हणजेच 0 ते 100km ची स्पीड फक्त 9.7 सेकंदांत घेते. या SUV ची टॉप स्पीड 155kmph आहे.

 

# पेट्रोल व्हेरिएंटपेक्षा असेल लांब
ह्युंदाई Kona इलेक्ट्रिकच्या फ्रंट ग्रिलला स्लीक ठेवण्यात आले आहे. ही पेट्रोल व्हर्जनच्या तुलनेत जास्त लांब आहे. कारच्या आत डिजीटल डॅशबोर्ड, हेड-अप डिस्प्ले आणि 7 इंची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन सिस्टिम देण्यात आली आहे. याची सीट अॅडजस्ट केली जाऊ शकते. ही SUV 5 सीटर आहे, यात 373 लीटरचा बूट स्पेसही मिळतो.  

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, Hyundai Kona इलेक्ट्रिक SUV चे काही कॉन्सेप्ट फोटोज...

बातम्या आणखी आहेत...