आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जगातील सर्वात छोटी गाय, पाहून तुमचेही डोळे उघडे राहतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्तापर्यंत तुम्ही जगातील सर्वात छोटा माणूस किंवा छोट्या महिलेविषयी ऐकले किंवा वाचले असेल, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात छोटी गाय विश्वातील इतर कोणत्याही देशात नाही तर आपल्या भारतात आहे. केरळ येथील अथहोली भागात असलेल्या सहा वर्षीय ‘मनिकयम’चे नाव गिनीज बुक ऑफ   वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी गाय म्हणून नोंदवण्यात आले आहे.


सामान्यतः गायीची उंची 4.8 ते 5 फूट आणि वजन 315 किलोग्रॅमच्या जवळपास असते परंतु मनिकयमची उंची केवळ 1.75 फूट आणि वजन 40 किलो आहे. म्हणजेच या गायीची उंची एखाद्या बकरीपेक्षासुद्धा कमी आहे. मागील दोन वर्षांपासून मनिकयमची ग्रोथ पूर्णपणे थांबलेली आहे.


जगातील सर्वात छोटी गाय असल्यामुळे मनिकयम फक्त केरळमध्येच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहे. दूर-दूरवरून पर्यटक मनिकयमला पाहण्यासाठी येत आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नाव आल्यामुळे मनिकयम एक सेलिब्रेटी बनली आहे. मनिकयमचे पालन करणारे लोक घरातील सदस्यांप्रमाणे तिची काळजी घेतात.


पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...