आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 5 सेकंदात ओळखा किती वर्षे जुनी आहे बाइक, इतकी सोपी आहे पद्धत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - भारतात बाइक विक्रीचे मार्केट दर महिन्याला वाढत आहे. 2016-17 मध्ये फक्त टू-व्हीलर्सच्या विक्रीचा आकडा 1.7 कोटींहून जास्त होता. 2015-16 मध्ये हा आकडा 1.6 कोटी होता. देशात सेकंड हँड बाइकची विक्रीही वेगाने वाढत आहे. या प्रकारच्या मार्केटमध्ये कमी पैशांमध्ये जास्त पॉवरफूल बाइक मिळते. अनेक सेकंड हँड बाइक मार्केटमध्ये तर 70 ते 80 हजार रुपयांची बाइक 10 ते 15 हजारांत मिळते. अशा वेळी बाइक नेमकी किती जुनी आहे हे माहिती असणे गरजेचे ठरते. बाइकच्या वयाची माहिती त्यातील चेसिस किंवा व्हेइकल आयडेंटिफिकेशन नंबर (VIN) वरून तुम्हाला सहज कळू शकते.


# कुठे असतो चेसिस नंबर
जवळजवळ सर्वच बाइकमध्ये चेसिस नंबर हँडलच्या खालच्या बाजूला असतो. म्हणजेच हँडलच्या सपोर्टिंग पाइपवर लेफ्ट वा राइटमध्ये कुठेही असू शकतो. उदा. बजाज अॅव्हेंजरमध्ये हा नंबर डाव्या हाताला पाइपवर असतो. हा नंबर 13 अंकी असतो. यात अल्फाबेट आणि न्यूमेरिक दोन्ही असतात. हे सर्व वेगवेगळ्या तऱ्हेच्या डिव्हाइस केलेले आहेत. म्हणजेच प्रत्येक नंबरचा एक वेगळा अर्थ असतो.

 

# बाइकचे वय कळेल
13 डिजिटच्या चेसिस नंबरमध्ये 10व्या नंबरवर एखाद्या बाइकचे वय म्हणजेच किती जुनी आहे, हे कळते. 10वा नंबर अल्फाबेट वा न्यूमेरिक असू शकतो. या दोन्हींचा वेगळा अर्थ आहे. उदा.  जर तुमच्या बाइकच्या चेसिस नंबरचे 10 अक्षर G आहे. तर याचा अर्थ गाडीची 2016ची मॅन्युफॅक्चरिंग आहे. मग भलेही कंपनीने त्या मॉडलची 2017 किंवा दुसऱ्या वर्षात विक्री केलेली असेल.

 

पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या बाइकच्या चेसिस नंबरच्या 10व्या शब्दावरून तिच्या वयाची माहिती...

बातम्या आणखी आहेत...