आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरभाडे Google अॅपने दिले, तर असे मिळतील 5 हजार रुपये परत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - जर तुम्ही गुगल अॅपच्या माध्यमातून घराचा किराया दिला तर गुगलकडून 5 हजार रुपयांचे रिवॉर्ड मिळू शकते. गुगलने ही स्कीम फक्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठी आणली आहे. यात युजरला फक्त अॅपच्या माध्यमातून घरभाडे द्यावे लागेल. घरभाडे दिल्यावर युजरला रिवॉर्ड म्हणून व्हाउचर्स मिळतील.

लकी युजरला 5 हजार रुपयांपर्यंतचे रेंट व्हाउचर गुगलकडून मिळू शकते. जे लकी युजर्स असतील, त्यांच्या अकाउंटमध्ये कंपनी थेट पैसे ट्रान्सफर करेल. जर एखाद्या युजरने फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांच्या घरभाड्यात रेंट स्क्रॅच कार्ड मिळाले असेल तर तो 100 टक्के कॅशबॅकचा हक्कदार असेल. म्हणजेच जेवढे भाडे तुम्ही देता ते पूर्णपणे कंपनीच पे करेल. तथापि, ही रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.

 

काय करावे लागेल?
ज्या युजरला या स्कीमचा फायदा उचलायचा आहे, त्यांना फक्त गुगल अॅप Tez मधून पेमेंट करावे लागेल. तुमचे ट्रान्झॅक्शन 5 हजार वा त्याहून जास्त असले पाहिजे. युजरला पेमेंट डिस्क्रिप्शनमध्ये #rentwithez लिहावे लागेल. यानंतर तुम्हाला स्क्रॅच कार्ड मिळेल. तुम्ही तेज अॅपच्या माध्यमातूनही दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये आपल्या अकाउंटमधून थेट पैसे ट्रान्सफर करू शकता.

 

31 मार्चपर्यंत आहे ऑफर
ही ऑफर फक्त 31 मार्च 2018 पर्यंत आहे. एका महिन्यात युजरला एकच रिवॉर्ड मिळेल. युजरला स्क्रॅच कार्ड मिळेल. हे  5 हजार रुपयांपर्यंत असू शकते. जर दोन्ही महिन्यांत रेंट स्क्रॅच कार्ड युजरला मिळाले तर तो 100 टक्के कॅशबॅकसाठी एलिजिबल होईल. ही रक्कम जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते. जर तुम्ही प्राइस मनी जिंकले तर हा पैसा तुमच्या बँक अकाउंटमध्ये येईल. गुगलवरून पेमेंट करण्यासाठी तुमचे सेव्हिंग अकाउंट यूपीआय एनॅबल्ड असले पाहिजे. रिवॉर्ड क्लेम केल्याच्या 45 दिवसांपर्यंत तुमच्या यूपीआय एनॅबल्ड सेव्हिंग अकाउंटला तेज अकाउंटशी लिंक करावे लागेल. गुगलचे कर्मचारी, इंटर्नस, कॉन्ट्रॅक्टर्स, ऑफिस होल्डर्स, गुगल पार्टनर्स या ऑफरसाठी एलिजिबल नाहीत.

 

70 पेक्षा जास्त बिलांचे पेमेंट करू शकतात, पाहा पुढच्या स्लाइडवर...

बातम्या आणखी आहेत...