Home »National »Other State» How To Start Business With Ola

फक्त 21 हजार रुपये देऊन स्वत:कडे कार नसतानाही तुम्ही करू शकता OLA तून कमाई

दिव्य मराठी वेब टीम | Feb 13, 2018, 10:29 AM IST

युटिलिटी डेस्क -जर तुमच्याकडे कार नसेल तरीही तुम्ही ओलासोबत मिळून कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावे लागेल. ही रक्कम 21 ते 31 हजारांपर्यंत (गाडीच्या मॉडलनुसार) द्यावी लागते. या स्कीमचा फायदा असा आहे की, तुम्ही कोणताही मोठा खर्च केल्याशिवाय आपल्या पसंतीची गाडी कंपनीकडून लीजवर घेऊ शकता. लीजवर गाडी घेऊन 1 लाख रुपये महिन्यापर्यंत कमाई केली जाऊ शकते.

यात मेंटेनन्सचा खर्चही कंपनीच उचलते. सोबतच 2 लाख रुपयांपर्यंत फ्री अॅक्सिडेंटल इन्श्योरेंस तुम्हाला मिळते. तुम्हाला दररोजच्या आपल्या कमाईतील ठराविक रक्कम कंपनीला द्यायची असते. याला सब्सक्रिप्शन फीस म्हणतात. प्रत्येक राइडवर कंपनी कमिशन घेते. या स्कीमनुसार 3 वर्षांनंतर तुम्ही गाडी स्वत:च्या नावावरही करू शकता.

लीजवर कशी घेऊ शकता गाडी, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

Next Article

Recommended