आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबरी मशीद विध्वंस: आतापर्यंत जाणून घ्या काय-काय घडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल सात वर्षांपासून प्रलंबित अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टात आज (गुरुवार) सुनावणी होईल. राममंदिर आणि बाबरी मशीद वाद देशाच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारताच्या इतिहासात 6 डिसेंबर 1992 रोजी 1.5 लाख कारसेवकांच्या रॅली दरम्यान उसळलेल्या दंगलीत बाबरी मशीद पाडण्यात आली होती. हा एक दिवस काळा दिवस म्हणून रेकॉर्ड केला आहे.

 


बाबरी मशीद विध्वंस आणि अयोध्या राम जन्मभूमी विवाद?

- 22 डिसेंबर 1949 च्या मध्यरात्री जन्मभूमी स्थळी रामलल्ला प्रकट झाले. ते ठिकाण वादग्रस्त वास्तूच्या घुमटाखाली होते. तेव्हा हिंदू संघटनांनी ही राम जन्मभूमी आहे आणि येथे रामाचा जन्म झाला होता त्यामुळे येथे राम मंदिर उभारले जावे अशी मागणी केली. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत होते. तेव्हापासून या वादग्रस्त जागेसाठी कोर्टात खटला चालू आहे.


उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील अयोध्येत तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तत्कालिन जिल्हा दंडाधिकार्‍यांनी कलम 145 अतंर्गत वादग्रस्त वास्तूतील राम मंदिर बंद केले आणि तिथे कोर्ट रिसीव्हर नियुक्त केला. मात्र, एका पुजार्‍याला दिवसांतून दोनवेळा वादग्रस्त वास्तूतील मंदिरात जाऊन पुजा करण्याची परवानगी दिली. त्यासोबत कुलुप बंद मंदिराबाहेरून भक्तांना रामाचे दर्शन घेण्याची अनुमती देण्यात आली. बंदद्वार राम मंदिरासमोर मग भक्त 'श्रीराम जयराम जयजय राम' अखंड किर्तन करु लागले.

 

1983 मध्ये मंदिर बांधण्याचा संकल्प
मुझफ्फरनगर येथे 1983 मध्ये झालेल्या एका हिंदू संमेलनात उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते दाऊ दयाल खन्ना यांनी अयोध्येसाठी हिंदू समाजाने प्रखर आंदोलन केले पाहिजे असे आव्हान केले होते. येथूनच मंदिराच्या मागणीने राजकीय रुप घेतले असे मानले जाते.


1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) दिल्ली येथे झालेल्या पहिल्या धर्म संसदेत राम जन्मभूमीवर लावलेले कुलूप उघडण्यासाठी जनजागरण करण्याचा प्रस्ताव पास केला. तेव्हा पासून कुलुप उघडण्यासाठीचे आंदोलन सुरु झाले.

 

राम जन्मभूमीचे कुलुप उघडले
ऑक्टोबर 1984 मध्ये विहिंपने सीतामढ़ी ते दिल्ली पर्यंत राम-जानकी रथ यात्रा काढली. दरम्यान तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यामुळे ती स्थगित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा 1985 मध्ये यात्रेला सुरुवात करण्यात आली. या रथ यात्रेच्या प्रभावामुळे फैजाबादच्या तत्कालिन जिल्हाधिकार्‍यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी राम जन्मभूमीवर लावण्यात आलेले कुलुप उघडण्याचे आदेश दिले. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते वीर बहादुर सिंह आणि पंतप्रधान होते राजीव गांधी.

 

- वर्ष 2010 मध्ये इलाहाबाद कोर्टाने एक मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला. अलाहाबाद हाय कोर्टाच्या लखनऊ पीठाने वादग्रस्त जमीनीला तीन भागात वाटले. ज्यामध्ये एक भाग राम मंदिर, दुसरा सुन्नी वक्फ बोर्ड आणि तीसरा निर्मोही आखाड्याला दिला गेला. 


- मात्र 2011 मध्ये सुप्रीम कोर्टात इलाहाबाद हाय कोर्टाच्या या निर्णयाला बंदी घातली. यानंतर 2017 मार्चमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले की परस्पर संमतीसह निराकरण केले गेले.

 

हे लोक बाबरी मशीदांसाठी लढले
बाबरी मशीदसाठी 1949 पासून मुस्लीम समुदाचे पक्षाकार हमीश अंसारी लढत होते. पण आता ते या जगात नाही. मुलगा इकबाल अंसारी यांनी त्यांची जागा घेतली आहे.

तेथेच निर्मोही अखाड्यालाही याच विवाद जमीनीचा भाग मिळाला आहे. मात्र तेथील महंत भास्करदास यांचा मृत्यू झाला आणि भास्करदासाचे शिष्य महंत रामदास त्यांची केस लढत आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा काही दुर्मिळ फोटो...

बातम्या आणखी आहेत...