आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सच्या राष्ट्रपतींना पसंत आले भारतीय जेवण, बनारसी चाटसोबत वाढली कढी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - देशाची सांस्कृतिक राजधानी या नावाने प्रसिद्ध काशीनगरीसाठी 12 मार्च दिवस खूप खास होता. पीएम नरेन्द्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मैक्रो येथील दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी एकसाथ शहरातील नदेसर पॅलेसमध्ये लंच केले यादरम्यान अनेक ऐतिहासिक निर्णयही घेतले. दोघांना येथील डिश पसंत आली आणि जेवणाचे जोरदार कौतुक केले. 

 

सोन्याच्या थाळीत वाढले अन्न.. 
- ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार, या पॅलेसमध्ये पोहोचल्यानंतर कारमधून उतरल्यावर पीएम मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष रेड कॉर्पेटवरून पॅलेसमध्ये गेले.
- दोन्ही नेत्यांचे स्वागत गुलाबपुष्पांची बरसात करून करण्यात आले. हे पाहून राष्ट्राध्यक्ष मॅक्रों खूप आनंदित दिसले.
- आत गेल्यानंतर डायनिंग टेबलवर दोन्ही नेत्यांनी सोन्याच्या थाळीत राजेशाही अंदाजात लंच केले.
- त्यांच्या थाळीत भरपूर व्यंजने वाढण्यात आली होती. यात वाराणसीच्या प्रसिद्ध डिशेसही होत्या.
- सूत्रांनुसार, मॅक्रों यांनी सर्व डिशेसचा मनसोक्त आस्वाद घेतला.

 

नदेसर पॅलेसमध्ये केले लंच, यांनी बांधले पॅलेस
- नदेसर पॅलेसला पूर्वी काशी स्टेटची नदेसरी कोठी म्हटले जायचे. या पॅलेसला 18व्या शतकाच्या अखेरीस महाराज ऑफ बनारस यांनी जेम्स प्रिंसेप यांच्या सांगण्यावरून पाहुण्यांच्या रहिवासासाठी बनवले होते.
- त्या काळी जेम्स प्रिंसेप वाराणसीच्या प्राचीन इतिहासावर रिसर्च करत होते. प्रिंसेपच्याच देखरेखीत नदेसर कोठीचे रिनोव्हेशन करण्यात आले होते.
- इतिहासकारांच्या मते, नदेसर पॅलेसचे नाव बनारसच्या महाराजांच्या सांगण्यावरून नदेश्वरी देवीच्या नावावर ठेवण्यात आले होते. बनारसचे महाराजा प्रभु नारायण सिंह हे सत्ताकाळात 1889 ते 1931 पर्यंत याच पॅलेसमध्ये राहिले होते.

 

एवढी आहे येथे राहण्याची किंमत
- ही नदेसरी कोठी आता नदेसर पॅलेसमध्ये रूपांतरित झाली आहे. पॅलेसमध्ये एकूण 10 लक्झरी रूम आहेत. येथे एका रात्रीच्या निवासासाठी 60 हजार ते 80 हजारपर्यंत किराया द्यावा लागतो. सूत्रांनुसार, रूममध्ये गेस्टला त्यांच्या नावाचे गोल्डचे पेन-पेन्सिल दिले जातात.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, फ्रान्सचे राष्ट्रपती आणि मोदी यांना कोणकोणती व्यंजने वाढण्यात आली होती...

बातम्या आणखी आहेत...