आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरबमध्ये शेख काय-काय जुलूम करतो; तरुणीने व्हिडिओतून ढसाढसा रडत केली मदतीची याचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - सौदी अरबमध्ये शेखच्या घरी अडकलेल्या गोरसिया निहाल गावातील परमजित कौरने शुक्रवारी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. 1.10 मिनिटांच्या या व्हिडिओत परमजित ढसाढसा रडत सरकारला मदत करण्याची विनंती करत आहे. परमजितच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांनी अकाली दलाचे आमदार गुरप्रताप सिंग वडाला आणि काँग्रेस खासदार संतोखसिंग चौधरी यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी मदतीचे आश्वासन दिले, परंतु पैसे देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. परंतु, यानंतर दमदमी टकसालने व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मुंबईतील एजंटला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 


परमजितचे वडील म्हणाले की, सर्वात आधी त्या शेखला 5.10 लाख रुपये देऊन परमजितला परत आणणे गरजेचे आहे. एजंट तर शेखचे पैसे घेऊन पळून गेला आहे. त्याला कधी अटक होईल, देव जाणे. आम्हाला आताच मदतीची गरज आहे.

 

नकोदरहून पोलिस पथक मुंबईत छाप्यासाठी रवाना 
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नकोदर पोलिस पुन्हा एजंट रेशम भट्टीचा दुसरा एक साथीदार खानला अटक करण्यासाठी मुंबईला गेले आहे. याआधीही नकोदर पोलिस एजंट खानच्या अटकेसाठी गेले होते; पण तेव्हा त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.

 

सगळे पैसे खानकडे, मला माझा हिस्सा अजून मिळायचा होता...
डीएसपी मुकेश कुमार म्हणाले की, ट्रॅव्हल एजंट भट्टीच्या मते मुख्य आरोपी खान आहे. खानने त्याला त्याचा हिस्सा दिला नव्हता, पण हिस्सा मिळण्याआधीच परमजित तेथे अडकल्याची बातमी त्यांना कळली आणि तो भीतीने तिथून पळून गेला.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, शेख काय-काय जुलूम करतो परमजितवर...