आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Honeypreet: 11 Things You Should Know About Ram Rahim Daughter Honey Preet Insan

आता होईल 'हनीप्रीत'चा फैसला: जाणून घ्या तिच्या 11 गोष्टी ज्या कुणालाच माहिती नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - पंचकुला हिंसाचार प्रकरणी आरोपी हनीप्रीत इन्साला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. राम रहिमला बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर 25 ऑगस्ट 2017 ला हरियाणामधील पंचकुलासह विविध ठिकाणी हिंसाचार घडवून आणल्याचा हनीप्रीतवर आरोप आहे. हरियाणा पोलिसांच्या एसआयटीने (स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम) पंचकुला स्पेशल ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टात 979 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींच्या जामीन अर्जावर 19 जानेवारीला सुनावणी होणार आहे तर 21 फेब्रुवारीला आरोप निश्चित केले जाणार आहेत.

 

असे आहे आरोप
- पोलिसांनी हनीप्रीत आणि डेराच्या इतर कर्मचाऱ्यांवर राजद्रोह, हिंसा भडकवणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे असे आरोप ठेवले आहेत. 
- 25 ऑगस्टला हरियाणामध्ये हिंसाचार भडकल्यानंतर हनीप्रीत 38 दिवस बेपत्ता होती. 3 ऑक्टोबरला तिला अटक करण्यात आली होती. हनीप्रीतचे खरे नाव प्रियंका तनेजा आहे. 
- पंचकुला हिंसाचारात 41 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 260 जण जखमी झाले होते. काही तुरळक घटना दिल्ली आणि पंजाबमध्ये ही झाल्या होत्या. 

 

23 ऑक्टोबरपासून हनीप्रीत तुरुंगात
- हनीप्रीत 23 ऑक्टोबरपासून अंबाला सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. हिंसाचारात तिचा सहभाग सिद्ध करण्यासाठी एसआयटीने तिला हरियाणातील विविध ठिकाणी नेले होते. 
- पंचकुलाच्या एका कोर्टाने सप्टेंबरमध्ये डेराचे तीन प्रमुख कार्यकर्ते हनीप्रीत इन्सा, आदित्य इन्सा आणि पवन इन्सा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले होते. या तिघांविरोधात राजद्रोह, हिंसाचार भडकवणे, डेरा प्रमुख आणि बलात्कारातील दोषी राम रहीमला पळवण्याचे षडयंत्र रचणे अशा आरोपांखाली गुन्हे दाखल केले होते.

 

कोण आहे हनीप्रीत....
हनीप्रीत ही बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या राम रहीमच्या एवढी जवळची होती की, पावला पावलावर ती त्याच्यासोबत सावलीसारखी राहायची. प्रियंका तनेजा हे तिचे मूळ नाव. ते बदलून राम रहीमने हनीप्रीत ठेवले. तिला बनवण्यात बाबाचा मोठा हात आहे. राम रहीमने हनीप्रीतच्या घटस्फोटानंतर तिला आपली मानलेली मुलगी बनवले होते. तथापि, हनीप्रीतच्या माजी पतीच आरोप होता की, बाबा आणि त्याच्या पत्नीचे अवैध लैंगिक संबंध होते. ज्यामुळे त्याने हनीप्रीतपासून घटस्फोट घेतला होता. 
-दुसरीकडे, डेराप्रमुख गुरमित राम रहीमचे सेवादार भूपिंदर सिंग म्हणाले होते की, बाबाची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतमुळे बाबाच्या कुटुंबात नेहमी वाद व्हायचे. सर्व कुटुंबीय तिचा विरोध करत होते. कारण गुरमित हनीप्रीतसोबत राहून इतरांना पाण्यात पाहायचा. डेऱ्यातही चर्चा व्हायची की दोघांचे अवैध संबंध आहेत. भूपिंदर सिंग म्हणाले की, याची एकदाची पूर्ण चौकशी व्हायलाच पाहिजे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हनीप्रीतच्या अननोन 11 बाबी....

बातम्या आणखी आहेत...