आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या मुलीची गॅंगरेप करून निर्घृण हत्या; प्रायव्हेट पार्टमध्ये घातली लोखंडी सळई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जींद/कुरुक्षेत्र- हरियाणातील जींद जिल्ह्यात रेल्वे रुळाशेजारी विवस्रावस्थेत दहावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. विद्यार्थिनी कुरुक्षेत्र येथील राहाणारी होती. अज्ञात नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. नंतर तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह विवस्रावस्थेत रेल्वे रुळाशेजारी फेकून दिला. इतकेच नाही तर नराधमांनी मुलीच्या मृतदेहाचीही विटंबना केल्याचे समोर आले आहे.

 

प्रायव्हेट पार्टमध्ये घातली लोखंडी सळई
रोहतक पीजीआयमध्ये मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्‍यात आले. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये नराधमांनी लोखंडी सळई घातली होती. पुरावा नष्ट करण्यासाठी नराधमांनी मुलीच्या मृतदेहाची विटंबना केली. तिचा चेहरा विदृप करण्यात आला होता.

 

संतप्त नातवाईकांनी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुरुक्षेत्र पोलिस स्टेशनसमोर मुलीच्या नातेवाईकांनी धरणे आंदोलन केले.

 

एसपी अभिषेक गर्ग यांनी सांगितले की, आरोपींच्या शोधार्थ पोलिस रवाना झाले आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

 

घरातून ट्यूशनला निघाली होती विद्यार्थिनी...
- सूत्रांनी सांगितले की, कुरुक्षेत्रमधील आपल्या गावाहून 9 जानेवारीला मुलगी घरातून सकाळी ट्यूशनला निघाली होती. रात्र झाली तरी ती घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
- 12 जानेवारीला मुलीचा मृतदेह विवस्रावस्थेत जिंद जिल्ह्यातील बूढाखेडाजवळील रेल्वे रुळाजवळ आढळून आला.
- पोलिसांनी बूढाखेडाचे सरपंच सुरेश कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- मुलीच्या मृतदेहावर अनेक जखमा आहेत.
- नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाची विटंबना करून मृतदेह फेकून दिला.
- मुलीला पाण्यात बुडवून ठार मारण्यात आल्याचा खुलासा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

 

दोन एसआयटी स्थापन...

- घटनेची गंभीरता ओळखून एसएसपी अरुण कुमार यांनी दोन विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन केल्या आहेत. समितीत डीएसपी सुनील कुमार आणि डीएसपी कप्तान सिंह, महिला ठाण्याच्या प्रभारी संतोष देवी आणि महिला सेल इंचार्ज कमलेश देवी यांचा समावेश आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...