आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थिएटरमध्ये तुमच्यासाठी असतात या सुविधा, न मिळाल्यास वसूल करू शकता भरपाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - तुम्ही मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेल्यावर तुम्हाला पिण्याचे पाणी सोबत नेण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. जर पिण्याचे पाणी आत नेण्यावर बंदी आणली जात असेल तर संचालकाने सिनेमा हॉलमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. सिनेमा हॉल मालक कोणत्याही व्यक्तीला कॅफेटेरियामधून खूप महाग पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी मजबूर करू शकत नाही. 

> राष्ट्रीय ग्राहक मंचाने अशाच एका प्रकरणात सप्टेंबर 2015 मध्ये निर्णय दिलेला आहे. तेव्हा मंचाने एका व्यक्तीला पाण्याची बॉटल आत न नेऊ दिल्याने 11 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. बेंचने निर्णय देताना म्हटले होते की, 'सिनेमा हॉल ड्रिंकिंग वॉटर बाहेरून नेण्यासाठी रोखतात, पण स्वत: आत पाण्याची सुविधा उपलब्ध करत नाहीत. हे ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या सेवेचे उल्लंघन आहे.' प्रेक्षक आरामदायक आणि आल्हाददायक वातावरणात चित्रपट पाहण्यासाठी पैसे खर्च करतो. जर असे होत नसेल तर त्याला भरपाईचा अधिकार असतो.

 

...तर येथे करू शकता तक्रार
> एक ग्राहक म्हणून तुम्हाला जर तुमचे अधिकार डावलले जात असल्याचे वाटत असेल तर तुम्ही ग्राहक मंचात तक्रार दाखल करू शकता. 20 लाख क्लेमपर्यंतची प्रकरणे जिल्हा ग्राहक मंचात पाहिली जातात. ग्राहक मंच इंदूरचे ऑफिस सुपरिटेंडंट आर. बी. सोनी म्हणाले की, 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकरणात फक्त 100 रुपये फीस तक्रारकर्त्याला द्यावी लागते. दुसरीकडे 20 लाख रुपयांच्या प्रकरणात बहुतांश वेळा 500 रुपये फीस घेतली जाते. तक्रार साध्या कागदावर केली जाऊ शकते. जर 20 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे प्रकरण असेल तर ग्राहक राज्य ग्राहक मंचात तक्रार करू शकतो. ग्राहक मंचाने असे अनेक निर्णय दिलेले आहेत ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 
सिनेमा हॉलमध्ये मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...