आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Love , Sex Aur Dhokha, Hasin Jahan Files Domestic Violence Case Against Cricketer Shammi In Kolkata Court

लव्ह, सेक्स और धोका...हसीन जहाँने मोहम्मद शमीला मागितली 10 लाख रुपयांची पोटगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्स आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने कोलकाता येथील अलीपूर येथील कोर्टात पोटगीसाठी याचिका दाखल केली आहे. स्वत:चा आणि मुलीचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी शमीकडून वर्षाला10 लाख रुपये (90 हजार रुपये प्रत‍ि महिना) मिळावे, अशी मागणी केली आहे.

 

कौटुं‍बिक हिंसाचारविरोधी कायदा 2005 नुसार दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना अलिपूर कोर्टाचे तिसरे न्यायदंडाधिकार्‍यांनी शमीसह सह आरोपींना समन्स मिळाल्यानंतर 15 दिवसांत कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहे.

 

हसीन जहाँचे वकील जाकिर हुसैन यांनी सांगितले की, 'न्यायदंडानिधारी यांनी आमची विनंती मान्य केली असून प्रतिवादी पक्षाला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे. 

 

दरम्यान हसीन जहाँने पती शमी, सासू अंजुमन आरा बेगम, नणंद सबीना अंजुम, दीर मोहम्मद हसीब अहमद आणि त्याची पत्नी शमा परवीन हिच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. जहाँ हिने 8 मार्च रोजी जाधवपूर पोलिस स्टेशनमध्ये शमीसह त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती.

 

अॅड. जाकिर यांनी सांगितले की, जहाँ हिने दाखल केलेला खटला आणि आताची तक्रारयात फरक आहे. ते म्हणाले की, शमीने आतापर्यंत जहाँ हिला एक रुपयाही दिलेला नाही. त्याने तिला एक लाख रुपयांचा चेक दिला होता. परंतु तोही बाऊंस झाला होता. आता तिच्याकडे स्वत:चा आणि मुलीचा उदरनिर्वाह भागविण्यासााठी पैसे नाहीत.

 

जहाँ हिने कोर्टात सांगितले की, शमी हा वर्षाला जवळपास 100 कोटी रुपये कमावतो. त्यामुळे त्याला पोटगी देण्यास काहीच अडचण यायला नको. पत्नी आणि मुलींची काळजी घेणे, हे शमीचे कर्तव्यच आहे.

बातम्या आणखी आहेत...