आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Must Know All Banks Charges For All Services Which Will Auto Debit From Your Account

BOI: बँक पासबुक अपडेशन ते चेकपर्यंत, या 15 सेवांवरही लागू शकतात चार्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - बँकांमध्ये 20 जानेवारीपासून विविध सर्व्हिसेससाठी नवे चार्ज लागू होऊ शकतात. बँक ऑफ इंडिया (BOI)च्या बोर्डाने 20 जानेवारीपासून विविध सर्व्हिसेससाठी चार्ज वाढवण्यासाठी अप्रूव्हलही दिले आहे.

> दुसरीकडे, इतर बँकांमध्येही याबाबत तयारी सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इतर बँकाही लवकरच या नव्या रेटसह घोषणा करू शकतात. बँका आपली आपली आर्थिक स्थिती ठीक करण्यासाठी आणि नुकसान कमी करण्यासाठी हे करत आहेत.

> बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मंजुरीनंतर BOIने 20 जानेवारीपासून लागू होणाऱ्या प्रस्तावावर नवे चार्ज आपल्या वेबसाइटवर प्रकाशित  टाकले आहेत. 

>तथापि, आरबीआयच्या दिशा-निर्देशांनुसार, डेबिट कार्डसारख्या निवडक सर्व्हिसेस सोडून इतर सर्व सुविधांसाठी सर्व बँका आपल्या लेव्हलवर चार्ज ठरवू शकतात. BOI (बँक ऑफ इंडिया) नेही असेच केले आहे.

 

> नव्या चार्जबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राचे एक वरिष्ठ अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले की, या प्रकारची तयारी सुरू आहे. कारण बँकिंग सेक्टरची परिस्थिती आता बिघडत चालली आहे. नुकसान वाढत आहे. दुसरीकडे सरकार ऑनलाइन ट्रान्झॅक्शनलाही चालना देऊ इच्छिते. अशा वेळी विविध बँका सर्व्हिसेससाठी चार्ज वाढवण्याच्या तयारीत आहेत.  

 

प्रत्येक सर्व्हिससाठी लागेल हा चार्ज  
- बँका आपले नुकसान भरून काढण्यासाठी आता प्रत्येक तऱ्हेची फ्री सर्व्हिस पेड करू शकतात. बँक ऑफ इंडियाने याबद्दलची घोषणाही केली आहे. इतर बँकांची घोषणा अद्याप बाकी आहे.
- बँक ऑफ ऑफ इंडियाच्या नव्या चार्जनुसार, बँकेतून पैसे काढणे असो, जमा करणे असो, चेक असो वा केवायसी करणे असो, एवढेच काय पासबुक अपडेट केल्यासही BOI ग्राहकांना बँकेचे निश्चित केलेल चार्ज द्यावे लागतील. असेच चार्ज वाढवण्याची तयारी इतर बँकांनीही केली आहे. तथापि, इतर एखाद्या सर्व्हिससाठी किती चार्ज करतील याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

भाजपचे ट्विट...

दरम्यान, या प्रकरणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.  सोबतच त्यांनी इंडियन बँक असोसिएशनने या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढल्याचेही स्पष्ट केले आहे. या प्रसिद्धिपत्रकातील मजकूरही भाजपने पोस्ट केला आहे.


जाणून घ्या, बँक ऑफ इंडियाच्या नव्या प्रस्तावानुसार कोणत्या सर्व्हिससाठी किती रुपये द्यावे लागतील, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...