आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 लाखांची कार फक्त 60 हजार रुपयांत, हे आहे भारताचे स्वस्त सेकंड हँड कार मार्केट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - जर तुम्हाला कार खरेदी करायची आहे, परंतु तुमच्या बजेट एखाद्या बाइकच्या किमतीएवढेही नसेल तरीही तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. भारतात अनेक ठिकाणी सेकंड हँड कारचे मार्केट आहे. येथे लाखो रुपयांच्या कार काही हजारांत मिळतात. असेच एक मार्केट दिल्लीच्या करोल बागमध्ये आहे. येथे सेकंड हँड मारुती वॅगनआर फक्त 60 हजारांत खरेदी केली जाऊ शकते. तथापि, वॅगनआरच्या टॉप मॉडेलची ऑन रोड प्राइस 5 लाख 6 हजार रुपये आहे.

 

# येथे आहे हे मार्केट 
दिल्लीत सेकंड हँड बाइकचे सर्वात मोठे मार्केट करोल बागमध्ये आहे. ते वॉटर बोर्डजवळ स्थित आहे. येथे मारुतीपासून ते महिंद्रा, फोर्ड, ह्युंदाई, फोक्सवॅगनसहित अनेक ब्रँडच्या कार मिळतील. या कारची कंडिशन चांगली दिसते. म्हणजेच त्यांच्यावर कोणतेही डेंट नसते आणि त्या चकाकणाऱ्या दिसतात. कारचे मॉडेल जितके जुने असेल, तितकी जास्त त्याची किंमत कमी होईल. म्हणजेच 2005चे मॉडेल असणारी वॅगनआर 60 हजारांत खरेदी करता येऊ शकता.

 

# फायनान्सची सुविधाही
सेकंड हँड कारच्या या मार्केटमध्ये आम्ही S.S.S Ji Car Bike & Properties डीलरशी बातचीत केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, येथे सेकंड हँड कार 60 हजार रुपयांपासून मिळणे सुरू होते. ही अमाउंट फायनान्सद्वारेही मिळवली जाऊ शकते. कारसोबतच तिचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही दिले जाते. म्हणजेच या कारमध्ये कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होण्याची शक्यता उरत नाही. आणि मुख्य म्हणजे कारच्या प्राइसवर तुम्ही बार्गेनिंगही करू शकता.

 

# या बाबी ठेवा लक्षात 
जर तुम्ही या मार्केटमध्ये कार खरेदी करण्यासाठी जात असाल तर या बाबीकडे जरूर लक्ष द्या की, तुम्हाला कारर्च सर्व पार्टसचे बेसिक नॉलेज असावे. खासकरून कारच्या इंजिनमध्ये बिघाड असू शकतो. सोबतच, एखादा पार्ट नकलीही असू शकतो. अशा वेळी एखाद्या कार एक्स्पर्ट वा मेकॅनिकलाही सोबत घेऊन जाऊ शकता.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, येथे किती किमतीत मिळते सेकंड हँड कार...


नोट : यात दाखवण्यात आलेल्या कारची किंमत मार्केटमध्ये कमी-जास्त होत असते. एवढेच नाही, जी किंमत दाखवण्यात आली आहे, तुम्ही बार्गेनिंग करून ती कमी किमतीवरही खरेदी करू शकता. 

बातम्या आणखी आहेत...