आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall: दीर-भावजयीच्या प्रेमाची अखेर, व्हॉट्सअॅपवर टाकला हा शेवटचा मेसेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक प्रेमी तारूण्यात आल्यानंतर एकमेकांमधील शारीरिक आकर्षण वाढून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. काही मुली या प्रेमातून सावरतात तर काही चित्रपटातील कथानकाप्रमाणे थेट घरच्यांशी बंडखोरी करून घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. तर अनेक जण आपली जीवनयात्रा मध्येच संपवतात. असेच एक प्रकरण गतवर्षी उजेडात आले होते, ज्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. 

 

अजितगड (सीकर) - सीकरच्या अजितगडमध्ये दीर-भावजयीने आत्महत्या केली होती. दोघांनी या प्रेमप्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी जीवनयात्रा संपवली. दिराने मंदिरातील पताक्यांच्या दोरीने गळफास घेतला, तर भावजयीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे, दोघांनाही दोन-दोन मुले आहेत.

 

असे होते संपूर्ण प्रकरण...
- अडवालिया गावात सुमनदेवी (30) तिचा नवरा सीताराम स्वामी राहतात. सीताराम गुडगावात नोकरी करतो. दोघांनाही दोन मुले आहेत.
- याच गावात पूरणमल स्वामी (23) राहायचा. तोसुद्धा गुडगावात मुनिमकी करायचा. पूरणमल सुमनच्या भावकीतला असल्याने तिच्याशी दीराचे नाते होते. पूरणलाही एक मुलगा अन् एक मुलगी होती.
- पूरणमल स्वामीने घरगुती व्हॉट्सअॅप ग्रुपवर शुक्रवारी सकाळी 8.32ला पोस्ट केले की धर्मशाळेत माझा मृतदेह पडलाय, घेऊन जा.
- यानंतर नातेवाईकांनी मंदिरात जाऊन पाहिले तर निश्चेष्ट पूरणमल पताक्यांच्या दोरीनेच फास घेऊन लोंबकळलेला दिसला.
- घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेऊन याबाबत नातेवाइकांकडे चौकशी केली.
घरात झाले होते भांडण
- सुमन आणि पूरणमलमध्ये खूप काळापासून प्रेमप्रकरण सुरू होते. घरच्यांना ही बाब कळली. गुरुवारी पूरणने सुमनला फोन केला. सुमनच्या नंदेला याचा सुगावा लागला. तिने भावाला याबाबत सांगितले. नंतर सुमन आणि तिच्या सख्ख्या दिरामध्ये यावरून कडाक्याचे भांडण झाले.

 

दोघांनी केली आत्महत्या...
- यानंतर सुमनने रात्रीच विहिरीत उडी मारली. त्याच वेळी पुरणमल अविनाशी मंदिराच्या धर्मशाळेत पोहोचला. मंदिराच्या पताका तोडून त्याचा फास बनवला आणि गळफास घेतला. 
- सकाळी सुमन घरात आढळली नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली, तर जवळच्याच विहिरीत तिची डेडबॉडी तरंगताना दिसली. 
- निदान मुलांकडे पाहून तरी असे निघून जायचे नसते म्हणत नातेवाइकांनी टाहो फोडला होता. 
- याप्रकरणी दोन्ही प्रकरणांची पोलिसांत झाली आहे. सीताराम म्हणाला, मी सकाळी पाहिले तेव्हा बायको घरात नव्हती. शोधल्यावर विहिरीत तिचा देह तरंगताना आढळला. दुसरीकडे, पुरणचे नातेवाइक म्हणाले की, काल रात्रीपासूनच तो बेपत्ता होता. सकाळी मंदिरात फासावर लटकलेला दिसला. पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.
 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
सर्व फोटो: चैतन्य मीणा

बातम्या आणखी आहेत...