आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर- 'व्हायरल गर्ल' अर्थात मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला एका गाण्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. मल्याळम भाषेतील 'उरू अडार लव' या चित्रपटातील 'मानिका मलयारा पूवी' या गाण्यात शाळेच्या दिवसांतले प्रेम दाखविले आहे. या गाण्यामुळे एका रात्रीत प्रिया स्टार बनली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याला एका मारवाडी तरुणीची माहिती घेऊन आलो आहे, ती म्हणजे ट्विंकल वैष्णव हिची.
मागील वर्षी राजस्थानचा एक मारवाडी व्हिडिओ व्हायरल झाला होता. ट्विंकल वैष्णव हिचा तो व्हिडिओ होता. राजस्थानी अंदाजात ती स्टँडअप कॉमेडी करताना दिसली होती. 31 डिसेंबरला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. अल्पावधीत 1 लाखाहून जास्त यूजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यू-ट्यूबच्या टॉप ट्रेंडमध्ये हा व्हिडिओ 27 क्रमांकावर पोहोचला आहे.
व्हिडिओमध्ये काय होते खास?
- ट्विंकल वैष्णव आपल्या खास शैलीत कॉमेडी करताना दिसते.
- तिने हिंदी आणि इंग्रजीतील काही शब्द हटके अंदाजात राजस्थानीत ट्रान्सलेट करून सादर केले आहेत.
- राजस्थानी कॉमेडी शो या नावाने यू-ट्यूब चॅनलवरून अपलोड करण्यात आला आहे.
- या चॅनलवर वेगवेगळ्या कलाकारांचे कॉमेडी शो अपलोड केले जातात. आतापर्यंत 3 लाखाहून जास्त यूजर्सनी हे चॅनल सबक्राइब केले आहे.
वेग-वेगळ्या भूमिकेत दिसते ट्विंकल...
- यापूर्वीही ट्विंकलचे अनेक शो या चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे.
- ती कधी राजस्थानी तर कधी नवरीच्या वेशभुषेत कॉमेडी करताना दिसते.
पुढील स्लाइड्सवर पाहा... ट्विंकल वैश्नव हिचे निवडक फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.