आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क - 10 रुपयांच्या नाण्यांबद्दल सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आहे. लोक खऱ्या नाण्यांनाही नकली समजत आहेत. आरबीआयनेही याबाबत स्पष्ट केलेले आहे. आरबीआयने वेळोवेळी वेगवेगळ्या डिझाइन्सची नाणी जारी केलेली आहे. यातील कोणतेही नाणे बनावट नाही. आज आम्ही सर्व 14 डिझाइन्सच्या नाण्यांचे फोटोज तुम्हाला या वृत्ताद्वारे दाखवत आहोत. हे पाहिल्यानंतर नक्कीच तुमचा संभ्रम दूर होण्यास मदत होईल आणि कोणीही तुम्हाला नकली नाणे देऊ शकणार नाही.
आरबीआयने जारी केलेले आहेत 14 डिझाइन्सचे 10 रुपयांचे नाणे...
> 26 मार्च 2009 पासून ते 29 जून 2017 पर्यंत सरकारने एकूण 14 डिझाइन्समध्ये 10 रुपयांचे नाणे जारी केलेले आहेत. 26 मार्च 2009 रोजी कनेक्टिव्हिटी अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी थीमवर 10 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले. या कॉइनच्या फेसला तीन पोर्शनमध्ये डिव्हाइड करण्यात आले होते. यात दोन हॉरिझोंटल लाइन होत्या. याच्या टॉप पोर्शनमध्ये भारत आणि इंडिया दोन्हीही लिहिण्यात आले होते.
> 26 मार्च 2009 रोजीच या प्रकारचे दुसरे नाणेही जारी करण्यात आले होते. ते विविधतेत एकता या थीमवर जारी करण्यात आले होते. देशाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे नाणे होते. 11 फेब्रुवारी 2010 रोजी तिसरे नाणे जारी करण्यात आले होते. ते होमी भाभा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्मृतीनिमित्त जारी करण्यात आले होते. यानंतर 1 एप्रिल 2010 रोजी आरबीआयला 75 वर्षे पूर्ण झाल्यावर नाणे गेले होते. याप्रकारे विविध निमित्तांनी इतर डिझाइन्सचे नाणेही जारी करण्यात आले होते.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, कोणते नाणे केव्हा जारी करण्यात आले होते आणि ते खरोखर दिसते कसे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.