आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा नंबर लपवून असा करा कॉल; Truecaller देखील नाही पकडू शकणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क- गूगल प्ले स्टोअरवर यूटिलिटीशी निगडीत अनेक फ्री अॅप्स आहेत. यात असे देखील काही अॅप्स आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा ओरिजनल नंबर लपवून कॉल करू शकता. अशाच एका अॅपचे नाव आहे IndyCall. या अॅपचे वैशिष्टय् म्हणजे तुम्ही देशात कुठेही फ्री कॉलिंग करू शकता. म्हणजे तुमच्या फोनमध्ये सिम नसेल तरि देखील तुम्ही कॉल करू शकता. तसेच प्रत्येकवेळी तुम्ही एका नव्या क्रमांकावरून कॉल करू शकता.


# डाटाद्वारे कॉलिंग...
या अॅपचे पुर्ण नाव 'IndyCall - Free calls to India' असे आहे. अॅपद्वारे जी कॉलिंग करण्यात येते ती डाटा द्वारे होत असते. म्हणजे युजरचा कॉल पूर्णपणे फ्री असतो, पंरतु तुमच्याकडे डाटा असणे आवश्यक आहे. डाटाद्वारे कॉल केल्यास समोरच्या मोबाईलवर एक नविन नंबर दिसतो. 


# यूजर लपवू शकतो आपला नंबर...
या अॅफचा वापर असे युजर्स करू शकतात ज्यांना आपला नंबर समोरच्यापासून लपवायचा आहे. महिला एखाद्या नव्या नंबरवर कॉल करत असेल तर ती आपला नंबर बदलून कॉल करू शकते. अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच नंबरवप कॉल केला तरी प्रत्येक वेळी नविन नंबर दिसले. हा एक फेक नंबर असतो, त्यामुळे यावर रिटर्न कॉल देखील येऊ शकत नाही.

 

# Truecaller नाही दाखवत डिटेल्स...
IndyCall अॅपवरून केलेल्या कॉलला Truecaller देखील सर्च नाही करू शकत. एवढेच नाही तर Truecaller वर प्रत्येकवेळी नंबर वेग-वेगळ्या शहरातील, राज्यातील दिसतो.


# IndyCall अॅपविषयी...
IndyCall - Free calls to India अॅप प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करू शकता. Moto X Play हँडसेटमध्ये अॅपने 65MB चा स्पेस घेतला आहे. प्रत्येक फोनवर वेग-वेगळा स्पेस घेतला आहे. हे अॅप अँड्रॉइडच्या 4.0 Ice Cream Sandwich आणि त्यापेक्षा अपग्रेड वर्जनवर इन्स्टॉल करता येते. आता पर्यंत 10 लाखांहून अधिक वेळा अॅप इन्स्टॉल करण्यात आलेले आहे. इन्स्टॉल केल्यानंतर यात कोणतीच सेटिंग करावी लागत नाही. 


पुढील स्लाइडवर जाणून घ्या काय आहे IndyCall अॅपवरून कॉलिंग ची प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...