आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीशी बळजबरी संबंध बनवणे रेप आहे का? या जजना विचारले होते असे प्रश्न..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद(यूपी) - हायकोर्टाकडून आयोजित UP HJS(हायर जुडिशियल सर्विस) 2016 चे रिझल्ट 18 ऑगस्ट 2017 रोजी जारी झाले होते. महानगर, आंबेडकरनगर येथील जैनेंद्र कुमार पांडेय (37) यांनी यूपी एचजेएसमध्ये 21वी रँक मिळवली आहे. 16 वेळा अटेम्प्ट करून सक्सेसपर्यंत पोहाचून त्यांनी एचजेएसच्या इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय केले.  DivyaMarathi.comशी जैनेंद्र यांनी बातचीत केली आणि इंटरव्ह्यूमध्ये विचारलेली प्रश्नोत्तरे शेअर केली.

(पुढच्या स्लाइड्सवर इन्फोमध्ये वाचा, इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे...)

 

Q. पत्नीच्या इच्छेविरुद्ध फिजिकल रिलेशन बनवणे रेपच्या श्रेणीत येते अथवा नाही?
A.
मॅरिटल रेपची कॉन्सेप्ट भारतात लागू नाहीये, यामुळे रेपच्या श्रेणीत येणार नाही. 11 ऑक्टोबर 2017 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने मॅरिटल रेपची कॉन्सेप्ट भारतातही लागू केली आहे. 

 

एक भाऊ आणि 3 बहिणींमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत जैनेंद्र 
- जैनेंद्र कुमार पांडेय यांचे वडील नंदलाल पांडेय असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेसमध्ये कार्यरत होते, जे आता निवृत्त झालेले आहेत. आई सावित्री हाऊसवाइफ आहे.
- एक भाऊ जितेंद्र आणि तीन बहिणींत जैनेंद्र चौथ्या क्रमांकावर आहेत. वडिलांच्या जॉबमुळे जैनेंद्र यांची अनेक वेळा शाळाही बदलली. 
- 12th पर्यंतचे शिक्षण जीआयसी कॉलेज सुल्तानपूरमधून घेतले. दरम्यान, त्यांच्या वडिलांचे ट्रान्सफर अलाहाबादला झाले. अलाहाबाद युनिवर्सिटीतून एलएलबी सेकंड क्लासमधून पास केली. मग आयआयएम आणि नेट फर्स्ट क्लास पास झाले.

 

भावाला मिळाला बँकेत जॉब तेव्हा वाढला दबाव... 
- ते सांगतात, ''अनेक एक्झाम आणि इंटरव्ह्यूमध्ये अपयश आल्यानंतर माझ्यासमोर खूप मोठे आव्हान होते, ते म्हणजे संयम कायम ठेवण्याचे.''
- ''यासोबतच काही कौटुंबिक जबाबदाऱ्याही होत्या. ज्यासाठी स्वत:लाही तयार करायचे होते.''
- ''माझ्या बहिणींचे लग्न ठरले आणि आई घरात एकटी पडली, तेव्हा माझ्यासमोर मोठी समस्या आली होती. मग माझ्यावरही लग्नासाठी दबाव येऊ लागला.'' 
- ''छोटा भाऊ जितेंद्र त्या वेळी शिक्षण संपवून बँक ऑफ अमेरिकामध्ये जॉब करत होता, पण मी एक्झाम आणि इंटरव्ह्यूच्या दरम्यान अडकलो होतो.''
- ''मग मी सेटल्ड होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे छोट्या भावाचे लग्न आधी लावून दिले.''

 

8 वर्षांनंतर असे मिळाले सुयश...
- जैनेंद्र सांगतात की, ''मी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेतली आणि आपल्या लक्ष्यावर अढळ राहिलो.''
- ''पन्नास वेळा रिटन एक्झाम दिली. 16 वेळा इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो, पण क्लिअर करू शकलो नाही. एवढे सगळे होऊनही मी हार मानली नाही."
- आधी बिहार पीसीएस-जे मग सहायक अभियोजन अधिकारी (एपीओ) ची 5 वेळा मुलाखत दिली.
- यूपी पीसीएस-जे मग सहायक अभियोजन अधिकारी (एपीओ) चा 4 वेळा इंटरव्ह्यू दिला. पुढे एमपी पीसीएस-जे आणि हायर जुडिशल सर्विसचा 4 वेळा इंटरव्ह्यू दिला.
- उत्तराखंड पीसीएस-जे मग सहायक अभियोजन अधिकारी (एपीओ), यूपीएससी, सीनियर पब्लिक प्रॉसिक्यूटर(सीबीआई)। कठोर मेहनतीमुळे शेवटी 8 वर्षांनी मला यश मिळालेच.

 

कुटुंबाचे स्वप्न केले साकार
- जैनेंद्र म्हणाले, ''कुटुंबाचे स्वप्न होते की, अधिकारी होईन आणि दुसरे म्हणजे भारताच्या न्यायप्रक्रियेशी जोडून आपले योगदान देऊ शकेन.''  
- ''या उद्देशाने न्यायसंस्थेशी संबंधित अनेक परीक्षांमध्ये भाग घेतला, शेवटी न्यायिक सेवाच्या पदावर यश मिळवले.'' 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, एचजेएस इंटरव्ह्यूमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उमेदवाराने दिलेली उत्तरे...

बातम्या आणखी आहेत...