आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर: Jio युजर्सना मिळेल गिफ्ट, आता JioPhone मध्येही चालेल WhatsApp

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - रिलायन्स जिओ आपल्या 'इंडिया का स्मार्टफोन' म्हणजेच JioPhone ला पॉप्युलर आणि सामान्यांसाठी पूर्णपणे युजफूल बनवण्यासाठी सातत्याने अपडेट देत आहे. कंपनीचा हा फोन KaiOS ऑपरेटिंग सिस्टिमवर रन करतो. अशा वेळी व्हॉट्सअॅप आता असे अॅप बनवत आहे जे या OS वर रन करेल. म्हणजेच जिओ फोनवर व्हॉट्सअॅप चालवण्यासाठी आता कोणतीही ट्रिक वापरण्याची गरज नाही.

 
# WABetaInfo ने दिली ही माहिती...
व्हॉट्सअॅपशी जोडलेली डिटेल देणारी वेबसाइट आणि ट्विटर हँडल WABetaInfo अनुसार कंपनी KaiOS ऑपरेटिंग सिस्टिमसाठी अॅप बनवत आहे. दुसरीकडे कंपनी ब्लॅकबेरी आणि विंडोज फोनवर याचा सपोर्ट बंद केलेला आहे. तथापि, हे अॅप केव्हा लाँच केले जाईल याची माहिती त्यांनी अद्याप शेअर केलेली नाही.

 

# नोकिया फीचर फोनमध्ये चालेल व्हॉट्सअॅप
HMD ग्लोबलने नोकिया 8110 4G फीचर फोन लाँच केला आहे. हा फोन KaiOS ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. अशा वेळी या फोनवरही युजर व्हॉट्सअॅपचा आनंद घेऊन शकतील. या फोनमध्ये हॉटस्पॉट आणि WiFi यासारख्या अॅडव्हान्स फीचर्ससोबत गूगल असिस्टंट, गुगल सर्च आणि गूगल मॅप्सचा अॅक्सेसही देण्यात आला आहे.

 

# फेसबुकला करतो सपोर्ट
KaiOS ऑपरेटिंग सिस्टिमवर फेसबुक अॅप लाँच करण्यात आलेले आहे. याचा फायदा जिओ फोन युजर्सला मिळत आहे. यामुळे यात व्हॉट्सअॅप आल्यास जिओ फोन पूर्णपणे युजफूल होईल. या 1500 रुपयांच्या फोनमध्ये तुम्हाला जिओच्या शानदार प्लॅनसोबतच सर्वात पॉप्युलर अॅप्सही मिळतील. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, WABetaInfo च्या ट्विटचा स्क्रीनशॉट...

बातम्या आणखी आहेत...