आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - 14 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय कंडोम दिन आहे. आईवडील नेहमी बुचकळ्यात पडतात जेव्हा त्यांचा लहान मुलगा किंवा मुलगी त्यांना सेक्स वा त्यासंबंधी एखादा प्रश्न विचारतो. टीव्हीवर जर कंडोम वा सॅनिटरी नॅपकिनची एखादी जाहिरात येत असेल आणि त्यावेळी मुलाने एखादा प्रश्न विचारला तर घरातील मोठी माणसं चुपचाप तिथून निघून जाण्यातच भले समजतात. नाहीतर, निर्विकार चेहऱ्याने टीव्ही चॅनल बदलले जाते. पण प्रश्न फक्त टीव्ही चॅनल बदलून सुटणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.
> आपल्या देशात आजही सेक्सवर बोलणे योग्य समजले नाही, यामुळेच सेक्स एज्युकेशन अजून कोसो दूर आहे.
> आजच्या काळात जेथे इंटरनेटवर माहितीचा खजिना आहे, अशा वेळी आईवडिलांनी सेक्सला जाणूनबुजून एखादी गुप्त वा रहस्यमयी गोष्ट बनवू नये.
> तुम्ही लाख लपवाल पण मुले ती मुलेच... ती काहीही करून उत्तराचा शोध घेणारच. पण या काहीही करण्याच्या प्रयत्नात मुलांना वाईट पद्धती, प्रकारांचीच जास्त माहिती मिळते. कुतूहलापोटीच मुले असे करतात.
> आईवडिलांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलांना सेक्सबाबत व्यवस्थित समजून सांगावे. यामुळे तुमचे मूल भविष्यात जबाबदार आणि जागरूक बनेल, तसेच त्याच्यासोबत काही अनर्थाची शक्यता कमी होईल.
वाचा पुढच्या स्लाइड्सवर, जर तुमचा मुलगा कंडोमबाबत विचारत असेल, तर असे द्या उत्तर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.