आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हापासून जेलमध्ये गेले लालू, फेसबुकवर त्यांची ही मुलगी सातत्याने करतेय सपोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालूंची क्रमांक दोनची मुलगी रोहिणी आचार्य सिंगापूरला राहाते. - Divya Marathi
लालूंची क्रमांक दोनची मुलगी रोहिणी आचार्य सिंगापूरला राहाते.

पाटणा - लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना 21 मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणारा आहे. लालू यादव चारा घोटाळ्यात प्रथम दोषी ठरले तेव्हा पासून आतापर्यंत त्यांची क्रमांक दोनची मुलगी रोहिणी आचार्य सतत त्यांना सपोर्ट करताना दिसत आहे. रोहिणीने फेसबुकवर रेल्वे टेंडर केस संबंधीची एक बातमी पोस्ट करत लिहिले, सत्यमेव जयते! लालू यादव यांची ही मुलगी सिंगापूरमध्ये राहाते. ती डॉक्टर आहे. 
  
  इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची सून झाली होती रोहिणी 
  - रोहिणीचे लग्न तिचे एमबीबीएस पूर्ण होण्याच्या आधीच झाले होते. रोहिणीचे पती समशेरसिंह हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. लग्न झाले तेव्हा ते अमेरिकेत नोकरी करीत होते. 
  - समशेरसिंहचे वडील राय रणविजय सिंह हे निवृत्त इन्कम टॅक्स ऑफिसर होते. ते लालूंचे कॉलेज फ्रेंड होते. 
  - लग्न झाले तेव्हा रोहिणी जमशेदपुर येथील एमजीएम कॉलेजमध्ये एमबीबीबएस करत होती. 
  
  सिंगापूरमध्ये राहाते 
  - रोहिणीचे पती समशेरसिंह हे सध्या सिंगापूरमध्ये सेटल झाले आहेत. ते सध्या एव्हरकोर पार्टनर्स या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. याआधी त्यांनी जीएमआर आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून जॉब केला होता. 
  
  उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या होत्या बातम्या 
  - गेल्या वर्षी जुलैमध्ये लालू यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या बेनामी संपत्तीचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा अशा बातम्या होत्या की लालू यादव तेजस्वी ऐवजी सिंगापूरमध्ये राहाणाऱ्या रोहिणी आचार्य यांना उपमुख्यमंत्री करणार आहेत. मात्र तसे काही झाले नाही. 
  - बेनामी संपत्ती प्रकरणात लालू यादव यांची मोठी मुलगी मीसा आणि जावई शैलैश कुमार यांचेही नाव होते. त्यामुळे रोहिणीचे नाव चर्चेत होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, लालूच्या सिंगापूरमधील मुलीचे पती आणि मुलांसोबतचे फोटो...