आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत अन् मस्त: येथे किलोच्या भावाने मिळतात लॅपटॉप, एवढी कमी आहे किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - दिल्लीत एक असे मार्केट आहे जेथे महागडे लॅपटॉप किलोच्या भावाने मिळतात. ज्या लॅपटॉपची शोरूमची किंमत कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये असते, तो येथे तराजूवर तोलून किलोच्या भावात विकला जातो. या मार्केटमध्ये चांगल्या कंडीशनचा लॅपटॉप फक्त 5 हजार रुपये किलोच्या रेटने खरेदी करता येतो. दिल्लीत हे मार्केट नेहरू प्लेसवर आहे. येथे असे अनेक शॉप आहेत जेथे लॅपटॉप फक्त 7 हजार रुपये वा त्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. 

 

# सेकंड हँड असतो लॅपटॉप
दिल्लीच्या नेहरू प्लेस स्थित या मार्केटला भारतासह एशियातील सर्वात स्वस्त मार्केट म्हटले जाते. येथे अनेक लैपटॉप, स्मार्टफोन यासह गॅजेट्स आणि डिव्हाइसेस खरेदी केले जाऊ शकतात. स्मार्टफोनशी संबंधित अॅक्सेसरीजही येथे खूप स्वस्त भावात मिळतात. येथे नवीन डिव्हाइससोबतच सेकंड हँड वस्तूही मिळतात. अशा वेळी तुम्हाला हे ओळखता आले पाहिजे.

 

# या बाबी ठेवा लक्षात
येथे सेकंड हँड वस्तूंची शेकडो दुकाने आहेत. अशा वेळी वस्तू घेण्यापूर्वी इतर जागीही रेट चेक करून घ्या. जर तुमच्यासोबत एखादा गॅजेट वा टेक्नॉलॉजीतला तज्ज्ञ असेल तर उत्तमच. सेकंड हँड वा नवा डिव्हाइस खरेदी करण्याआधी चांगला चेक करा. शक्यत तेवढे त्याला अनेकदा ऑन-ऑफ जरूर करून पाहा. लॅपटॉप घेण्याआधी तो काही वेळ सुरू करून जरूर पाहा. सोबतच, डिव्हाइस मॅनेजरमध्ये जाऊन त्याचे कॉन्फिग्रेशन चेक करून घ्या. आणि सर्वात शेवटी, ही बाब जरूर लक्षात ठेवा की, तुम्हाला नव्या पॅकिंगमध्ये जुने सामान तर दिले जात नाहीये ना!

 

# शॉपकीपरने दिली ही माहिती...
नेहरू मार्केटमधील Netcom कॉम्प्यूटर्सचे मालक रजत कपूर यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, त्यांच्याकडे सेकंड हँड लॅपटॉपची रेंज 7 हजारपासून सुरू होऊन 60 हजारांपर्यंत आहे. जेव्हा आम्ही एकत्र जास्त लॅपटॉप (5 ते 6) खरेदी करण्याविषयी म्हटले तेव्हा त्यांनी एक्स्ट्रा डिस्काउंटही ऑफर केले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, नेहरू प्लेसवरील या मार्केटचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...