आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूच्या दाढेतून केली मुलीची सुटका, 15 मिनिटे आईने दिली बिबट्याशी झुंज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहराइच- कर्तनियाघाट वाइल्ड लाइफ सेंचुरी जवळील जंगलाला लागून असलेल्या रमपुरवा गावात बुधवारी एका आईने बिबट्याशी झुंज करत आपल्या मुलीचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी येथे बिबट्याने एका 12 वर्षाच्या मुलीवर हल्ला केला आणि तिला फरपटत जंगलाकडे घेऊन जाऊ लागला. परंतु, मुलीच्या आईने त्याचा पाठलाग करून जवळपास 15 मिनिटे बिबट्याशी झुंज केली आणि आपल्या मुलीचे प्राण वाचवले.


लग्नासाठी आल्या होत्या माय-लेकी...
रमपुरवा येथील बनकटी गावात राहणाऱ्या अरविंद कुमार गौतम यांच्या घरी लग्न समारंभ होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अरविंद यांची नातेवाईक सिंधू आपली 12 वर्षाची मुलगी खुशभूसोबत आली होती. 


बिबट्याने केला हल्ला....
बुधवारी सकाळी दोघी माय-लेकी घरातून शेताकडे जात होत्या, तेव्हा आई काही अंतरावर चालत होती, तेवढ्यात बिबट्याने खुशबूवर हल्ला केला आणि तिला जबड्यात पकडून जंगलाकडे फरपटत घेऊन निघाला.


15 मिनिटे आईने दिली झुंज....
तेवढ्यात सिंदूने बिबट्याचा रस्ता अडवला आणि मुलीचा जिव वाचवण्यासाठी बिबट्याचा सामना केला. जवळपास 15 मिनिटे सिंधू बिबट्याशी लढत राहिली. दरम्यान, आवाज ऐकून घरातील सर्व लोक जंगलाच्या दिशने पळाले. लोकांना पाहून बिबट्याने मुलीला सोडून दिले आणि जंगलाकडे धाव घेतली.


खुशबू हॉस्पिटलमध्ये दाखल...
परंतु, या दरम्यान खुशबू गंभीर जखमी झाली आहे. नातेवाइकांनी खुशबूला सुजौली पीएचसी मध्ये भर्ती केले आहे. येथे तिची गंभीर अवस्था पाहून तिला जिल्हा रुग्नालयात रेफर करण्यात आले.


वन विभागाची टीम करत आहे तपास...
पोलिस अधिकारी परवेज यांनी घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांना शांत केले. डीएफओ जीपी सिंह यांनी सांगितले की, वन क्षेत्रात टीम तपासासाठी गेली अशून घटनेची चौकशी करण्यात येत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...