आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियल किलर: लग्नाचे आमिष दाखवून करायचा बलात्कार, 32 तरूणींना बनवले शिकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळूरू- सहा वर्षांमध्ये 32 महिलांवर बलात्कार करून साइनाइड देऊन हत्या करणारा सीरियल किलर मोहन कुमारला पुन्हा एकदा जन्मठेपेची शिक्षा सुनावन्यात आली आहे. साइनाइड मोहन या नावाने चर्चेत असलेल्या आरोपीला अॅडिशनल डिस्ट्रीक आणि सेशन कोर्टाने शिक्षा सुनावली. त्याच्यावर सुरू असलेल्या 32 प्रकरणांपैकी 20 मध्ये चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. मोहनला पाचव्या प्रकरणात पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


औषधाच्या जागी खाऊ घालायचा सायनाइड...
- मोहन 2003 पासून हे गुन्हे करत होता, परंतु, 2010 मध्ये त्याला पकडण्यात आले होते. सध्या सरु असलेले प्रकरण 2009 मधील आहे. यात मोहनने 28 वर्षीय अनिताला लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर गर्भनिरोधक कॅप्सून असल्याचे सांगून सायनाइडची कॅप्सूल खाऊ घातले होते. अनिताच्या मृत्यूनंतर तिच्या अंगावरील दागिने आणि तिच्याकडून पैसे घेऊन फरार झाला होता.

- 2003 मध्ये मोहनने सुनंदा नावाच्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि काही दिवासांनंतर तिची हत्या केली होती. सुनंदा घरातून मंदिरात जाण्यासाठी निघाली होती. यानंतर तिचा मृतदेह मैसूर बस स्टँडवर आढळून आला होता. 2009 मध्ये अनिता नावाच्या महिलेची हत्या केल्यानंतर या सीरीयल किलरच्या गुन्ह्याचा खुलासा झाला होता. 2010 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर मोहनवर चार वर्ष केस चालू होती. कोर्टाने मोहनला अनेक हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा, कोण आहे मोहन कुमार आणि पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...