आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे गीजर बनू शकते मृत्यूचे कारण, तुम्ही तर नाही ना करत ही चूक?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क- गाजियाबादमध्ये राहणाऱ्या सिंघानिया दांपत्याच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. या दोघांचा मृत्यू गीजरचा वापर केल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा प्रकराची घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील दिल्लीच्या गणेशनगरमध्ये राहणारी तरूणी, ग्रेटर नोएडाचे चेतन सैनी आणि पत्नी किरण आणि गाजियाबाद येतील तरूणाचा मृत्यूचे कारण देखील गीजरच बनले होते. या सर्वांचा मृत्यू बाथरूममध्ये दम घोटल्यामुळे झाला होता. गेल्या दोन दिवासांत गॅस गीजरमुळे 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही गॅस गीजरच्या Do's & Don'ts विषयी सांगत आहोत.


# तज्ञानी सांगितले....
गॅस गीजर अखेर कसे कोणाच्या मृत्यूचे कारण बनू शकते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही गव्हरमेंट होळकर सायन्स कॉलेज, इंदूरचे प्राध्यापक डॉक्टर आस सी दीक्षित यांच्याशी चर्चा केली. यावर त्यांनी सांगितले की, गॅस गीजर LPG च्या मदतीने पाणी गरम करते. तसेच, LPG ऑक्सीजनच्या संपर्कात आल्यानंतर पेट घेतो. एलपीजीमध्ये ब्यूटेन आणि प्रोपेन गॅस असतो आणि तो जळाल्यानंतर कार्बनडायऑक्साइड (CO2) निर्माण करते. अशात बाथरूम छोटे असल्यास ऑक्सीजन कमी आणि CO2 चे प्रमाण वाढू लागते. यामुळे माणसाचा दम घुटु लागतो आणि त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.


# जिवघेणा ठरू शकतो गॅस...
यशोदा हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. राकेश कुमार यांनी सागितले की, एलपीजी गीजरने निर्माण होणाऱ्या आगीमुळे ऑक्सिजन कमी पडतो. तसेच, कार्बन  मोनोऑक्साइड देखील निर्माण होतो. मस्तिष्कमध्ये ऑक्सिजनची कमी जिवघेणी ठरू शकते.


पुढील स्लाइडवर वाचा, गॅस गीजरचा उपयोग करताना काय काळजी घ्यावी....?

बातम्या आणखी आहेत...