आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना छातीवर गोळ्या झेलणाऱ्या पित्याला चिमुरडीने दिला अखेरचा निरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद नायक दीपक नैनवाल यांची मुलगी. - Divya Marathi
शहीद नायक दीपक नैनवाल यांची मुलगी.

नवी दिल्ली - दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानाला शेवटचा निरोप देतानाचा  त्यांच्या निरागस मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही हात जोडून ती आपल्या पित्याचे अखेरचे दर्शन घेताना दिसते. यावर एका युजरने ट्विट केले, आहे- तु दीपक नैनवाल यांची मुलगी नाही, तर या देशाची मुलगी आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी लढताना नायक दीपक नैनवाल जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, रविवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

 

ट्विटवर अशा आल्या प्रतिक्रिया..
@ravikant1
- 'या मुलीवर फार मोठे दुःख कोसळले आहे. माझे एकच सांगणे आहे- धैर्य ठेव. बहादूर बन. आम्ही तुझ्या सोबत आहोत. तु फक्त नायक दीपक नैनवाल यांची मुलगी नाही, तर या देशाची मुलगी आहे. नायक दीपक नैनवाल यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.'

@advocate_alakh
- 'कुलगाममध्ये शहीद झालेले जवान दीपक नैनवाल यांची मुलगी पित्याला श्रद्धांजली वाहाताना खूप रडली. डेहरादूनचा मित्रांना आवाहन आहे की कोणाकडे त्यांचा नंबर असेल तर द्या, मला त्या चिमुरडीकडे आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत.'

@HatindersinghR

- 'त्यांनी 17 तास दहशतवाद्यांशी मुकाबला केला. वाहेगुरु त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'

 

बातम्या आणखी आहेत...