आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis: पूर्वोत्तरमधील सर्वाधिक राज्यांमध्ये BJP, काँग्रेसपेक्षा जास्त नुकसान डाव्यांचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अगरतळा/शिलाँग/कोहिमा - त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभेची मतमोजणी सुरु आहे. पुर्वोत्तरच्या 8 राज्यांपैकी अरुणाचल, आसाम आणि मणिपुर नंतर आता त्रिपुरा भाजप शासित राज्य होणार आहे. 8 पैकी 4 राज्यांमध्ये आता भाजपचे सरकार असणार आहे. मेघालय आणि नागालँडमध्येही भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सिक्कीममध्ये भाजप सत्ताधारी एसडीएफ यांचा सहकारी पक्ष आहे. फक्त मिझोराममध्ये भाजप सत्तेतून बाहेर आहे. तिथे यावर्षी निवडणूक होणार आहे. 

 

निवडणूक झालेल्या राज्यात कोणाला काय फायदा-तोटा 


त्रिपुरा 


- येथे भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. फक्त भाजपच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाशी संबंधीत इतर संघटना, यामध्ये एकल विद्यालय, वनवासी कल्याण आश्रम या संघटना अनेक वर्षांपासून आदिवसांसोबत काम करत होत्या. त्यामुळे आदिवासींची मोठी व्होटबँक भाजपकडे वळवण्यास सुरुवात झाली होती. त्याचे दृष्यस्वरुप 2018च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले.  भाजपने प्रत्येक 60 मतदारांवर एक प्रमुख नेमला होता आणि प्रत्येक मतदाराची गाठभेट घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

 

सर्वाधिक फायदा कोणाला? 
- 40 पेक्षा जास्त जागा जिंकत भाजप सत्तेचा सोपान चढणार आहे तेव्हा सहाजिकच त्रिपुरामध्ये सर्वाधिक फायदा हा भाजपला झालेला आहे. इंडिजिनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) सोबत भाजपने आघाडी केली होती. या आघाडीचा भाजपला फायदा झाला आहे. 2013 मध्ये या आघाडीला एकही जागा मिळाली नव्हती. यंदा दोन्ही पक्ष निर्विवाद सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. 

 

सर्वाधिक तोटा कोणाचा? 
- त्रिपुरामधून डावे सत्तेबाहेर गेले असले तरी सर्वाधिक तोटा हा काँग्रेसचा झाला आहे. काँग्रेसचा राज्य गमावण्याचा आलेख हा खालीखाली चालला आहे. 
- त्रिपुरामध्ये काँग्रेस गेल्या 25 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. मात्र एक प्रबळ आणि प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेस राहिली होती. यंद त्यांच्या हातात एकही जागा राहाताना दिसत नाही. 2013 मध्ये काँग्रेसकडे 10 जागा होत्या. जागा कमी असल्या तरी त्यांची मतांची टक्केवारी 36.5% होती. 
- निवडणुकीच्या आधी त्यांचे अनेक आमदार आधी टीएमसीमध्ये गेले आणि नंतर भाजपमध्ये गेले. त्यांची मतांची टक्केवारी 2 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. 

 

डाव्यांनी काय गमावले? 
- त्रिपुरामध्ये गेल्या 40 वर्षांत झालेल्या 8 निवडणुकांमध्ये सीपीएमची मतांची टक्केवारी 45% पेक्षा कमी कधी झालेली नाही. यंदा मात्र त्यात मोठा घट दिसण्याची शक्यता आहे. 
- पश्चिम बंगालमधील सत्ता गेल्यानंतर त्रिपुरा हाच डाव्यांचा सर्वात मोठा 'लाल किल्ला' होता. त्याला भाजपने भगदाड पाडले आहे. त्रिपुरातील सत्ता गेल्यानंतर डाव्यांकडे आता फक्त केरळ हे एकमेव राज्य उरले आहे. 

 

भाजपच्या विजयाचा अर्थ? 
- भाजपला त्रिपुरामध्ये मूळ आदिवासी आणि बंगाली यांच्यातील अंतर्गत भांडणाचा फायदा झाला. त्रिपुरालँड समर्थक आयपीएफटीसोबत आघाडीचा भाजपला हा फायदा झाला. 
- त्रिपुरामध्ये 70% हिंदू हे नाथ संप्रदायाचे पाईक आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या संप्रदायाचे प्रमुख धर्मगुरु आहेत. 
- भाजपने योगींना त्रिपुरामध्ये स्टार प्रचारक केले होते. 

 

मेघालय 

 

येथील निवडणुकीचे वैशिष्ट्य काय? 
- निवडणुकीच्या काही काळ आधी सहकारी पक्ष एनपीपी आणि यूडीपी यांनी भाजपची साथ सोडली होती. मागील निवडणुकीत फक्त दोन जागा जिंकणाऱ्या एनपीपीने यावेळी मेघालयातील सर्वात मोठा क्रमांक दोनचा पक्ष बनण्याकडे घोडदौड केली आहे. 

 

निवडणुकीत सर्वाधिक फायदा कोणाला? 
- सर्वाधिक फायदा हा एनपीपी आणि भाजप यांना होताना दिसत आहे. भाजप त्यांचे जुने सहकारी एनपीपी आणि यूडीपी यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. 
- भाजपचे राम माधव यांनीही मेघालयात सत्ता स्थापन केली जाऊ शकते, याकडे इशारा केला आहे. 
- गोवा विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता मात्र भाजपने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आणि अपक्ष आणि इतर पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. तीच रणनीती मेघालयात अवलंबली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

सर्वाधिक तोटा कोणाचा? 
- गेल्या 9 वर्षांपासून येथे काँग्रेसच्या ताब्यात सत्ता होती. यावेळी येथे चौरंगी लढत (भाजप, एनपीपी आणि यूडीपी आणि काँग्रेस) झाली.

 

काँग्रेसने काय गमावले? 
- आधी आसाम नंतर मणिपुर असे पूर्वोत्तर मधील एक-एक राज्य काँग्रेसच्या हातातून निसटताना दिसत आहेत. 

 

भाजपसाठी विजयाचा अर्थ ? 
- 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे एकाही जागेवर भाजप उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरही नव्हते. एनपीपी आणि यूडीपीसोबत भाजपलाही येथे फायदा होताना दिसत आहे. हे दोन्ही पक्ष केंद्रात एनडीएचे सहकारी पक्ष आहेत. 
- संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर निवडणूक पूर्व आघाडी नसली तरी नंतर ते एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतात. 

 

पी.ए. संगमा यांच्या पक्षाचे पुढे काय? 
- काँग्रेस नेते आणि नंतर शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी लोकसभाध्यक्ष पी.ए. संगमा यांनी एनपीपी हा पक्ष स्थापन केला होता. 2013 मध्ये एनपीपीला दोन जागा मिळाल्या होत्या. 
- संगमा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा कॉनरोड संगमा यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा आली होती. कॉनरोड संगमा हे यावेळी मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 

बातम्या आणखी आहेत...