आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैदेतील फुटीरतावादी नेत्याच्या मुलींचे मोदींना पत्र, म्हटल्या-आम्ही अनाथ बनलोय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते शाहीद शाहिद उल इस्लाम यांच्या मुलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वडिलांना सोडण्याची विनंती केली आहे. मिशनरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या सुझैन आणि सुंदास यांनी या पत्रात मोदींच्या बेटी बचाओ-बेटी पढाओ घोषणेचा उल्लेखही केला. त्यांनी लिहिले, ज्या पंतप्रधानाच्या घोषणेमुळे मुलींच्या मनात आशेचा किरण उगवला आहे, त्याच देशात आम्ही शिक्षण घेण्यास असमर्थ ठरत आहोत. वडिलांशिवाय आम्ही अनाथ बनलो आहोत आणि घर तुरुंगासारखे झाले आहे. 


दहशतवाद्यांना निधी पुरवल्याच्या प्रकरणात एनआयए शाहीदच्या विरोधात चौकशी करत आहे. गेल्या एक वर्षापासून तो दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत आहे. शाहीद फुटीरतावादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्सचा प्रवक्ता आहे. शाहीदच्या मुलींनी लिहिले, आमच्यासाठी घर हे तुरुंगासारखे बनले आहे. जेव्हापासून वडील तुरुंगात गेले आहेत, त्यांच्यावर एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान मोठे मन दाखवत लवकरच या प्रकरणात हस्तक्षेप करतील. गेल्या 11 महिन्यांपासून आमचे जीवन नरकासमान बनले आहे. कारण आम्ही वडिलांना पाहूदेखिल शकत नाही. 

 
कुलभूषण यांच्या आई-पत्नीच्या स्थितीची जाणीव झाली 
मुलींनी तुरुंगात वडिलांशी भेटीचा उल्लेखही केला. वडिलांशी भेट झाली तेव्हा त्यांची अवस्था पाहून आम्हाला धक्का बसला. आमच्यात आणि त्यांच्यात काचेची भिंत होती. त्यांना स्पर्श करणे तर दूर आवाजही आमच्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता. आम्ही त्यांना लवकर ओळखलेही नाही. शुगर, हायपरटेन्शन, आर्थरायटिस, यामुळे त्रस्त असलेल्या वडिलांचे वजन 15 किलोने घटले होते. आम्हाला भारत, पाकिस्तान आणि काश्मीरच्या राजकारणाबाबत फार माहिती नाही. पण वडिलांशी भेटीनंतर पाकिस्तानच्या तुरुंगात कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या स्थितीची जाणीव झाली असे त्या म्हणाल्या. 

 
कोणत्यातू लेकीला तिहारला जावे लागू नये 
पत्रात पुढे लिहिले, आमच्या वडिलांना गुन्हेगार, नशेखोरांबरोबर ठेवलेले आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे. आमची भेटही दहशतीच्या वातावरणात झाली. जेव्हा इंटरकॉमवर आम्ही बोलणे संपवत होतो तेव्हा अचानक लाइन कट झाली आणि वीज गेली. कोणीतरी ओरडले वेळ संपली. आम्हाला वडिलांचा निरोपही घेता आला नाही. आम्ही अशी प्रार्थना करतो की, कधीही कोणत्याही मुलीला तिहारला जायला लागू नये. 

 

बातम्या आणखी आहेत...