आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधकांनी विद्यार्थ्यांसोबत संशोधन करावे- पंतप्रधान;भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद््घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंफाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी मणिपूर विद्यापीठात १०५ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद््घाटन झाले. चांगले संशोधक देशासाठी ऊर्जाकेंद्रासारखे असतात. खरे तर संशोधकांनी विद्यार्थ्यांसह १०० तास बसून संशोधनाचा प्रकल्प राबवला पाहिजे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकेल, असे मोदी म्हणाले.  असे मोदी म्हणाले. त्यांच्या हस्ते ७५० कोटी रुपयांच्या कल्याणकारी योजनांचे लोकार्पणही झाले.  

 

पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमध्ये एका जाहीर सभेलाही मार्गदर्शन केले. महान क्रांतिकारक राणी गायदिन्ल्यू यांचा ‘राष्ट्राची कन्या’  असा गौरव केला. मणिपूरचे लोक आनंदी असल्याचे पाहून राज्य सरकार किती चांगले काम करत आहे, हे लक्षात येऊ शकते. मणिपूरच्या विकासासाठी मला सुमारे ७५० कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ करण्याचे भाग्य लाभले. या योजनांच्या अंमलबजावणीतून राज्याचा निश्चितपणे विकास होऊ शकेल व राज्य नव्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. पूर्वीच्या सरकारमुळे 
राज्यात एक प्रकारची नकारात्मकता होती. आता ती राहिलेली नाही असे मोदी म्हणाले.  

 

जगातील तिसरी लेझर प्रयोगशाळा भारतात  
आपल्या संशोधकांनी एकाच वेळी १०० उपग्रह अंतराळात पाठवण्याची मोठी कामगिरी करून दाखवली. सरकारने लिबो या लेझर प्रयोग शाळेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. ही जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची लेझर प्रयोगशाळा ठरणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.  

 

मणिपूरमध्ये ७५० कोटींच्या प्रकल्पांना सुरुवात
मोदींनी राज्यासाठीच्या ७५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. विज्ञान परिषदेनंतर लुवांगपोक्पा बहुद्देशीय क्रीडा संकुल, राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तसेच स्वातंत्र्यसैनिक राणी गैदिनलियू उद्यानाचेदेखील त्यांच्या हस्ते उद््घाटन झाले. त्याशिवाय मणिपूरमध्ये १ हजार अंगणवाडी केंद्रे, अध्यापक आणि डॉक्टरांसाटी १९ वसाहतीच्या प्रकल्पांचीदेखील पायाभरणी करण्यात आली. 

 

भारतासाठी प्रेरणास्त्रोत होते स्टीफन हाॅकिंग

मोदी म्हणाले, जगप्रसिद्ध महान सायंटिस्ट स्टीफन हाॅकिंग काॅस्मोलाॅजीचे स्टार होते, भारतासाठी ते एक प्रेरणास्त्रोत होते. मोदी पुढे म्हणाले, पूर्वोतत्र भागात सायंस काॅंग्रेसचे आयोजन करण्याची ही दूसरी वेळ आहे. चांगले सायंटिस्ट हे देशासाठी एका पावर हाऊस सारखं काम करतात. सायंस आणि टेक्नाॅलाॅजीमुळे लोकांचे जीवन सोपे झाले आहे. ते पुढे म्हणाले की सन 1944 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूर मधूनच स्वातंत्र्याची लढाई सुरू केली होती. आज तोच आत्मविश्वास सायंसशी जोडल्या गेल्या लोकांमध्ये दिसत आहे. सरकार ने शेतक-यांना वातावरणाची माहिती देण्यासाठी पूर्वोत्तर भागाबरोबरच देशभरात अनेक ठिकाणी सेंटर्स सुरु केली आहेत. 


वैज्ञानिकांनी इनोव्हेटिव्ह टेक्नाॅलीजीचा शोध लावावा
मोदी पुढे म्हणाले, वातावरण बदलासाठी आपल्या नेहमी सतर्क रहावे लागेल. आम्ही नॅशनल बांबू मिशनच्या अंतर्गत बांबूचा गवताच्या कॅटेगरीत समावेश केला आहे. यामुळे बांबूची कापणी करताना कायदेशीर अडचणी येणार नाहीत. सीव्ही रामन यांच्या सोबतच अनेक वैज्ञानिकांकडून देशाला आणि समाजाला नवी आव्हाने स्वीकारण्याची प्रेरणा मिळते. विज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक कर्तव्ये पार पाडणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी देशातील वैज्ञानिकांना इनोव्हेटिव्ह टेक्नाॅलीजाची शोध लावण्याचे आवाहन करत आहे. तसेच 100 विद्यार्थ्यांनी 100 तासांसाठी एकत्र येऊन नवीन शोध लावावा. 


रिसर्च आणि डेव्हलपमेंटला दुस-यांदा परिभाषित करण्याची वेळ 
पीएम मोदी म्हणाले, आपल्या वैज्ञानिकांनी एकाच वेळी अंतराळात 100 सॅटेलाईट पाठवले आहेत. देशासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सरकारने लेझर टेक्नाॅलाॅजीत संशोधन करण्यासाठी जगातील तीसरी लेझर लॅब लिबोसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. आता देशातील रिसर्च एंड डेव्हलेपमेंटला दुस-यांदा परिभाषित करण्याची वेळ आली आहे. विज्ञान सगळ्यांसाठी याचा अर्थ समाजातील शेवटच्या व्यक्तीला देखील याचा लाभ मिळाला पाहिजे. त्यांचं जीवन वेगळं कसं असू शकते? समाजाला पुढे न्यायचे असेल त्यांच्या कल्याणासाठी काम करणे आवश्यक आहे. आता देशाला पुढे नेऊन जगात एक वेगळी ओळख निर्माण करण्याची वेळ आली आहे. मी सगळ्या वैज्ञानिकांना देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याचं आवाहन करत आहे. 


पाच हजार डेलिगेट्स होतील सामिल

न्यूज एजंसीनुसार मणिपूर विद्यापीठाचे पीआरओ यांनी सांगितले की या सायंस काँग्रेसमध्ये 5 डेलिगेट्स सामिल होतील, यामध्ये 3 नोबेल विनर, देशभरातील वैज्ञानिक, स्काॅलर आणि रिसर्चर यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी सायंस कांग्रेसच्या उद्घाटनानंतर लुवांगशांगबम साठी रवाना होतील तिथे ते लुवांगपोक्पा मल्टिस्पोर्टस काॅम्प्लेक्स, नॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी आणि स्वातंत्र्यसेनानी राणी गॅदिनलियु पार्कचं उद्घाटन करतील.याशिवाय मोदी 1000 आंगणवाडी केंद्रे शिक्षक आणि डाॅक्टर्ससाठी 19 रेसिडेंशियल काॅम्प्लेक्स तसेच अन्य काही प्रोजेक्टस भूमिपूजन करतील. नंतर त्यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...