आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने केली हुंड्याचा केस तर पोलिस लगेच करू शकत नाही अटक, जाणून घ्या नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - हुंड्यासाठी छळामुळे दरवर्षी 10 हजारहून जास्त तक्रारी खोट्या आढळतात. दरवर्षी 90 हजार ते 1 लाख केसेसमध्ये इन्व्हेस्टिगेशन केले जाते. हुंड्यासाठी छळाच्या एवढ्या खोट्या केसेस वाढल्या आहेत की, सुप्रीम कोर्टाने याचा चुकीचा वापर रोखण्यासाठी दिशानिर्देशही जारी केले आहेत. इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 498A चा वापर करून हुंड्याच्या अनेक खोट्या केसेस दाखल केल्या जातात. आज आम्ही सांगत आहोत, कोर्टाने दिलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनेबाबत आणि कोणी तुमच्यावर खोटी केस केली असेल तर कसे वाचू शकता. 

> या तऱ्हेच्या केसमध्ये एखादा तक्रार करत असेल तर सत्यतेची पडताळणी केल्याशिवाय अटक केली जाऊ शकत नाही.

> या प्रकरणात पडताळणी पोलिस नाही करत, तर कुटुंब कल्याण समिती करते. या समितीत 3 जण असतात. समितीचा रिपोर्ट येईपर्यंत पोलिसांनी अटकेसारखी कारवाई करू नये.
> ही समिती प्रत्येक जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीजद्वारा बनवली जाते. वेळोवेळी या समितींचाही रिव्ह्यू होतो.
> या समितीत लीगल वॉल्यूंटियर्स, सोशल वर्कर्स, रिटायर्ड पर्सन, वर्किंग ऑफिसर्सच्या पत्नी इत्यादींचा समावेश असतो. कमिटी मेंबर्स साक्षीदाराला बोलावू शकत नाहीत. 

 

खोट्या केसमध्ये तक्रारकर्त्यासोबतच पोलिस, वकिलावरही दाखल होऊ शकते केस, पाहा पुढच्या स्लाइडवर...

बातम्या आणखी आहेत...